ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या बुलढाणा जिल्हा सहसचिवपदी प्रवीण सरकटे यांची नियुक्ती
ग्राहक हक्कांचे संरक्षण, जनजागृती व सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या बुलढाणा जिल्हा सहसचिवपदी प्रवीण सरकटे यांची नियुक्ती
बुलढाणा (प्रतिनिधी) —गजानन सोनुने
ग्राहक हक्कांचे संरक्षण, जनजागृती व सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या बुलढाणा जिल्हा सहसचिवपदी प्रवीण सुभाषराव सरकटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दादाभाऊ केदारे व राष्ट्रीय सचिव माननीय अश्विन झोटिंग यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी समितीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
प्रवीण सरकटे हे सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून, ग्राहक फसवणूक, अन्यायकारक व्यवहार, सेवा त्रुटी तसेच नागरिकांच्या तक्रारींबाबत मार्गदर्शन करण्याचे कार्य ते सातत्याने करीत आहेत. त्यांच्या अनुभवाचा व कार्यकौशल्याचा लाभ बुलढाणा जिल्ह्यातील ग्राहक चळवळीला होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या नियुक्तीबद्दल डॉ. गंगाराम उबाळे, सामाजिक कार्यकर्ते गजानन भाऊ दराडे, सुरेश भाऊ बोर्डे, नानाभाऊ तौर, पत्रकार गजानन सोनुने, अमर भोसले, विशाल खरात, विश्वजीत बेंडमाळी व विठ्ठल राठोड यांनी प्रवीण सरकटे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
नवीन जबाबदारी स्वीकारताना प्रवीण सरकटे यांनी ग्राहकांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहून संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.




