कॉलेज शाळातपोवननाशिकपोलीसमहाराष्ट्रयुवाशाळे कॉलेज

नाशिक ग्रामीण पोलीस दलाचा रेझींग डे सप्ताह व साऊ ते जिजाऊ उपक्रमांतर्गत कुसूर शाळेत विद्यार्थ्यांना पोलीस मार्गदर्शन

नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या रेझींग डे सप्ताहानिमित्त तसेच साऊ ते जिजाऊ उपक्रमाच्या निमित्ताने कुसूर

नाशिक ग्रामीण पोलीस दलाचा रेझींग डे सप्ताह व साऊ ते जिजाऊ उपक्रमांतर्गत कुसूर शाळेत विद्यार्थ्यांना पोलीस मार्गदर्शन

            नाशिक येवला प्रतिनिधी : प्रवीण पाटील

नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या रेझींग डे सप्ताहानिमित्त तसेच साऊ ते जिजाऊ उपक्रमाच्या निमित्ताने कुसूर येथील क्रांतिवीर फुले विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात पार पडला. दिनांक ३ ते १२ जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना सामाजिक, शैक्षणिक व कायदेशीर बाबींचे महत्त्व समजावून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

साऊ ते जिजाऊ म्हणजे राजमाता जिजाऊ, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज घडवले, महाराष्ट्राला दिशा दिली आणि समाजाला न्याय, संस्कार व स्वराज्याची शिकवण दिली. तसेच महिलांच्या शिक्षणाचे दार उघडणाऱ्या, पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच औचित्याने विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाची ओळख व्हावी, पोलीस कसे काम करतात, कायदा-सुव्यवस्थेत त्यांची भूमिका काय असते हे समजावे, या उद्देशाने नाशिक ग्रामीण पोलीस दलाने शाळेला भेट दिली.

पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, PSI पवार, महिला पोलीस हवालदार सुनीता महाजन, पोलीस हवालदार संसारे व पोलीस कॉन्स्टेबल दराडे यांनी क्रांतिवीर फुले विद्यालय कुसूर येथे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.

यावेळी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम म्हणजे काय, मोबाईलचा अतिवापर केल्याने होणारे दुष्परिणाम, सोशल मीडियावरील फसवणूक, अनोळखी लिंक, कॉल व मेसेजपासून कसे सावध राहावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पोलीस वापरत असलेल्या शस्त्रांविषयी (हत्यारे/व्यपण) माहिती देऊन त्यांचा योग्य वापर, सुरक्षितता व जबाबदारी याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

महिला पोलीस हवालदार सुनीता महाजन यांनी विशेषतः मुली व मुलांशी मनमोकळा संवाद साधत, भविष्यात पोलीस भरतीसाठी कोणती तयारी करावी, शारीरिक व मानसिक मेहनत कशी घ्यावी, अभ्यासाचे महत्त्व काय आहे याबाबत मार्गदर्शन केले. “पोलीस म्हणजे तुमचे मित्र आहेत, भीती न बाळगता कोणतीही अडचण, अन्याय, अत्याचाराची घटना घडल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. गावात चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्या थांबवण्यासाठी मनातून ठाम भूमिका ठेवावी,” असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

यानंतर रेझींग डे सप्ताहाच्या निमित्ताने पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, PSI पवार यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना बंदूक कशी चालते, तिचा वापर कशासाठी केला जातो, सुरक्षिततेचे नियम कोणते असतात याची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

या कार्यक्रमाचे आयोजन क्रांतिवीर फुले विद्यालय कुसूर येथील मुख्याध्यापक शिंदे सर व त्यांच्या शिक्षकवृंद, कर्मचारी यांनी केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम व ढोल-ताशांच्या गजरात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिस्त व सहभाग पाहून उपस्थित पोलीस अधिकारी समाधान व्यक्त करत होते.

या मार्गदर्शनपर कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असून, कायदा, शिस्त, समाजातील जबाबदारी याचे महत्त्व पटले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी असा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याचे मत पालक व शिक्षकांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!