Uncategorized

शिवधर्म पीठावर जिजाऊ जयंतीनिमित्त ऐतिहासिक भव्य मुख्य सोहळा;

प्रशासन, पोलीस व सर्व यंत्रणा सज्ज – लाखो जिजाऊ भक्तांच्या उपस्थितीचे आवाहन

शिवधर्म पीठावर जिजाऊ जयंतीनिमित्त ऐतिहासिक भव्य मुख्य सोहळा;

प्रशासन, पोलीस व सर्व यंत्रणा सज्ज – लाखो जिजाऊ भक्तांच्या उपस्थितीचे आवाहन

           सिंदखेडराजा | प्रतिनिधी रवी ढवळे

मराठा समाजाच्या संस्कारांची जननी, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या ४१८ व्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने दि. १२ जानेवारी २०२६, सोमवार रोजी दुपारी १.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक शिवधर्म पीठावर भव्य, शिस्तबद्ध व ऐतिहासिक मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा सोहळा सिंदखेडराजा मतदारसंघ व तालुक्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा जिजाऊ जयंती महोत्सव ठरणार असून, जिजाऊ साहेबांच्या दर्शनासाठी व विचारांच्या जागरासाठी लाखो भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

या भव्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री फुलचंदजी खेडेकर साहेब राहणार आहेत.

प्रशासन व यंत्रणा पूर्णतः सज्ज

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य विभाग, अग्निशामक दल तसेच इतर सर्व संबंधित यंत्रणा पूर्णतः सज्ज असून, कार्यक्रम शांततापूर्ण व सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कार्यक्रमस्थळी वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका, आपत्कालीन सेवा, अग्निशमन व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली असून, भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. व्यवस्था अंतिम टप्प्यात

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आयोजकांच्या वतीने स्टॉल उभारणी, बैठक व्यवस्था, प्रवेश-निर्गम मार्ग, स्वच्छता, पाणीपुरवठा व सूचना फलकांचे काम अंतिम टप्प्यात असून, उद्याच्या भव्य कार्यक्रमासाठी सर्व आवश्यक सोयी-सुविधा पूर्णत्वास नेण्यात आल्या आहेत.

मान्यवरांची भव्य उपस्थिती या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आयुष मंत्री मा. ना. प्रतापराव जाधव,

महाराष्ट्र राज्याचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार वसंतराव वानखेडे, आमदार मनोजभाऊ कायदे, माजी आमदार रेखाताई खेडेकर, डॉ. शशिकांत खेडेकर,

इंजी. विजय घोगरे (प्रदेश अध्यक्ष, मराठा सेवा संघ), इंजी. नवनाथ घाडगे (प्रदेश कार्याध्यक्ष), इंजी. चंद्रशेखर शिरोरे (महासचिव), अर्जुनराव तानपुरे (जॉइंट महासचिव), मनोज आरखडे (प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड), कामाजी पवार (राष्ट्रीय अध्यक्ष, मराठा सेवा संघ), इंजी. मधुकरराव मेहकर (अध्यक्ष, जिजाऊ सृष्टी),

सौरभ तायडे (नगराध्यक्ष, सिंदखेडराजा)

आणि सिमाताई बोके (प्रदेश अध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

मराठा सेवा संघ पुरस्कार २०२६ चे वितरण

याच सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना मराठा सेवा संघ पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे समारोपीय मार्गदर्शन

शिवश्री अॅड. फुलचंदजी खेडेकर साहेब (दुसरी पिढी, संस्थापक अध्यक्ष – मराठा सेवा संघ) हे करणार आहेत.

पुढील धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम

दि. १३ जानेवारी २०२६ रोजी मेहुणराजा (ता. दे. राजा, जि. बुलढाणा) येथे

संत चोखामेळा महाराज जयंती व समाजप्रबोधन समारंभ आयोजित करण्यात आला असून,

या प्रसंगी शि.भ.प. ज्योतीताई जाधव (सिंदखेडराजा) यांचे कीर्तन होणार आहे.

दि. १४ जानेवारी २०२६ रोजी पहाटे महापूजा संपन्न होणार आहे. लाखोंच्या उपस्थितीचे आवाहन

राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या तेजस्वी विचारांचे दर्शन, भव्य जिजाऊ दर्शन आणि ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी

मराठा समाजातील सर्व बंधू-भगिनी, युवक-युवती, माता-भगिनी व जिजाऊ भक्तांनी शिस्तबद्ध पद्धतीने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समिती व मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!