आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवामहाराष्ट्रविदर्भस्वच्छता

तेल्हारा बसस्थानकावर हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत सखोल स्वच्छता अभियान संपन्न

हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत

तेल्हारा बसस्थानकावर हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत सखोल स्वच्छता अभियान संपन्न

 

प्रतिनिधी : राजेश पाटील खारोडे तेल्हारा तालुका

हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत तेल्हारा येथील बसस्थानक परिसरात सखोल स्वच्छता अभियान यशस्वीरीत्या राबविण्यात आले. या अभियानामुळे बसस्थानक परिसर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी बनविण्याचा सकारात्मक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला आहे.

या स्वच्छता अभियानात डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय, तेल्हारा येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) चे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. गोपाल ढोले सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षकवृंदामधील श्री. इंगळे सर, श्री. खुमकर सर व इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभागासाठी प्रोत्साहन दिले.

यावेळी रा.प. तेल्हारा आगाराचे आगार व्यवस्थापक श्री. शर्मा साहेब, कार्यशाळा अधीक्षक श्री. महल्ले साहेब, लेखाकार श्री. पांडे साहेब, वरिष्ठ लिपिक श्री. ठाकरे, श्री. राखोंडे, श्री. सोळंके, श्री. पुरी, श्री. गवई तसेच आगारातील सफाई कर्मचारी यांनीही परिश्रम घेऊन बसस्थानक परिसराची स्वच्छता केली.

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे हे केवळ प्रशासनाचे काम नसून नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश या अभियानातून देण्यात आला. स्वच्छ परिसरामुळे आजारांचा प्रादुर्भाव कमी होतो, प्रवाशांना चांगली सुविधा मिळते आणि शहराच्या एकूण आरोग्यदृष्ट्या सकारात्मक वातावरण निर्माण होते.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग भविष्यात स्वच्छतेबाबत सजग व जबाबदार नागरिक घडविण्यास उपयुक्त ठरणार असून अशा उपक्रमांचे सातत्य राखणे गरजेचे असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

प्रतिनिधी : राजेश पाटील खारोडे

तेल्हारा तालुका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!