गौरव पुरस्कारपत्रकार

वाशिम येथील गजानन बानोरे सर यांना दर्पण जीवन गौरव पुरस्कार जाहीर

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या दर्पण जीवन गौरव पुरस्कारांची अधिकृत घोषणा

वाशिम येथील गजानन बानोरे सर यांना दर्पण जीवन गौरव पुरस्कार जाहीर

    वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे रिसोड :

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या दर्पण जीवन गौरव पुरस्कारांची अधिकृत घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी केली आहे. यामध्ये रिसोड शहरातील, जिल्हा वाशिम येथील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते गजानन श्रीराम बानोरे यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील तसेच सामाजिक क्षेत्रातील दीर्घकालीन, प्रामाणिक व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना दर्पण जीवन गौरव पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आला आहे.

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न, सामान्य माणसांचे दुःख-वेदना, अन्याय-अत्याचार यांना वाचा फोडण्याचे कार्य गजानन बानोरे यांनी सातत्याने केले आहे. निष्पक्ष, निर्भीड व मूल्याधिष्ठित पत्रकारिता हीच त्यांची ओळख असून सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पत्रकार संघाने त्यांचा या मानाच्या पुरस्कारासाठी सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे.

दर्पण जीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता, साईबाबांची पुण्यभूमी शिर्डी येथे संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम विविध क्षेत्रातील अतिविशिष्ट मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार असून पत्रकारिता, समाजसेवा, कला, साहित्य आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिला-पुरुषांचा या वेळी सन्मान करण्यात येणार आहे.

या पुरस्कारासाठी गजानन श्रीराम बानोरे यांची निवड झाल्याबद्दल पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार तसेच विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या गौरव सोहळ्यास पत्रकार व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!