जयंतीधर्मबुलढाणामहाराष्ट्रमहिलाविदर्भसांप्रदायिकसामाजिक कार्यकर्तेसिंदखेड राजा

श्री संत गजानन महाराजांच्या १४८ व्या प्रगट दिनानिमित्त वाघाळा गावात भक्तीमय वातावरणात भव्य मिरवणूक

सिंदखेडराजा तालुक्यातील वाघाळा येथे श्री संत गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रगट दिनानिमित्त संपूर्ण गावात

श्री संत गजानन महाराजांच्या १४८ व्या प्रगट दिनानिमित्त वाघाळा गावात भक्तीमय वातावरणात भव्य मिरवणूक

          प्रतिनिधी – वाघाळा योगेश काकड

सिंदखेडराजा तालुक्यातील वाघाळा येथे श्री संत गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रगट दिनानिमित्त संपूर्ण गावात भक्ती, श्रद्धा व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या पावन दिनाचे औचित्य साधून गावातून भव्य-दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.

सकाळच्या सुमारास टाळ-मृदुंगाच्या गजरात, “श्री संत गजानन महाराज की जय”, “गण गण गणात बोते” अशा जयघोषांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले. भक्तीगीत, अभंग आणि नामस्मरणात रंगलेली ही मिरवणूक गावातील प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ होत भक्तांच्या श्रद्धेचे दर्शन घडवत होती.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गावातील महिला, पुरुष, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. गावात श्री संत गजानन महाराज यांची आकर्षक अशी छोटी मूर्ती स्थापन करण्यात आली. या मूर्तीची पूजा मिरवणूक अध्यक्ष गजानन वायाळ तसेच गावातील नागरिक व महिलांच्या हस्ते अत्यंत भक्तीभावाने करण्यात आली.

यानंतर गावात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सकाळी सुमारे १० वाजता मिरवणूक संपन्न झाली. त्यानंतर श्री संत गजानन महाराज मंदिरासमोर भव्य आरती संपन्न होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

या प्रसंगी गावाचे सरपंच विष्णू काकड, उपसरपंच सखाराम माळेकर, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र चव्हाण, ग्रामपंचायत ऑपरेटर विष्णू सोनुने, पोलिस पाटील के.बी. राठोड, ज्येष्ठ नागरिक विष्णू माटे, रवी राठोड, भजनी मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश्वर वायाळ, शाम सानप, टाळकरी संतोष चव्हाण, उद्धव काकड, भानुदास सोनुने, पांडुरंग जायभाये, ग्रामपंचायत शिपाई विनोद लाखे, रामा सोनुने, गजानन सोनुने, गजानन सानप, लता वायाळ, लता गीते, साधना सानप, कल्याणी नागरे, पत्रकार बद्री गीते तसेच वाघाळा प्रतिनिधी योगेश काकड यांच्यासह गावातील सर्व नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रम भक्ती, शिस्त व उत्साहात पार पडला. श्री संत गजानन महाराजांच्या कृपेने गावात सुख, शांती व समृद्धी नांदो, अशीच सर्व भाविकांची प्रार्थना होती.

गण गण गणात बोते…

जय गजानन महाराज!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!