धर्मबुलढाणाभीमा कोरेगावमहाराष्ट्रलोकल न्यूज़

मलकापूर पांग्रा येथे भीमा कोरेगाव शौर्यदिन उत्साहात साजरा

विजय स्तंभाला समता सैनिक दलाची मानवंदना

मलकापूर पांग्रा येथे भीमा कोरेगाव शौर्यदिन उत्साहात साजरा

विजय स्तंभाला समता सैनिक दलाची मानवंदना

         बुलढाणा | प्रतिनिधी : प्रा. दिलीप नाईकवाड

सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे २००८ वा भीमा कोरेगाव शौर्यदिन मोठ्या उत्साहात व शांततेच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त समता सैनिक दलाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत विजय स्तंभाला मानवंदना देण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. संतोष साळवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले, तर सरपंचपती व माजी सुभेदार सर्जेराव मगर यांच्या हस्ते पूजन करून विजय स्तंभाला आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून भीमा कोरेगाव युद्धातील शूर वीरांना समता सैनिक दलाच्या वतीने सलामी देण्यात आली.

या कार्यक्रमास सरपंचपती यादव टाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष साळवे, माजी सैनिक सर्जेराव मगर, माजी सैनिक शरद साळवे, कृषी शिक्षक शरद आटोळे, लुखमान शेख, फिरोज पठाण, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण देशमुख, रंगनाथ साळवे, बाळासाहेब पवार नागवंशी, महाराष्ट्र पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष भारत साळवे, दिलीप काकडे, आत्माराम काळे, मुबारक पठाण, रामभाऊ दराडे, उजेश सोनुने, विजय गायकवाड, बबन राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभीमान साळवे, अमोल पैठणे, सुनील साळवे, कैलास साळवे, अरुण लहाने, सागर मोरे, खडोबा काकडे, नंदकिशोर साळवे, सुनील बनसोडे, पवन साळवे, परमेश्वर साळवे, एकनाथ साळवे, सुनील मगर, नवनाथ मगर, अक्षय मगर, सुनील काकडे, भीमराव साळवे, विलास मोरे, संदीप शिनगारे, पंकज साळवे, सूरज मगर, पंढरी मगर, प्रदीप मगर, धर्मा काकडे, गौतम साळवे, शैलेश आराख आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सैनिक शरद साळवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. गंगाराम उबाळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!