छत्तीसगढ़टॉप न्यूज़दिल्ली NCRदुनियादेशपंजाबमहाराष्ट्रराजस्थानराज्यलोकल न्यूज़

गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून सिंदखेड राजा तालुक्यात शेंदुर्जन महसूल मंडळांमध्ये धो धो पाऊस पडत असताना सुद्धा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष

गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून सिंदखेड राजा तालुक्यात शेंदुर्जन महसूल मंडळांमध्ये धो धो पाऊस पडत असताना सुद्धा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष

शेंदुर्जन विशेष प्रतिनिधी, गजानन उ जायभाये 

दिनांक 2 सप्टेंबर रोजी तालुका सिनखेडराजा जिल्हा बुलढाणा शेंदुर्जन मंडळात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे 20 ते 25 गावे जलमय झाली असून शेतकऱ्यांची खरीप पिके—सोयाबीन, कापूस, तूर—मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेली आहेत. अनेक ठिकाणी शेतात १ ते २ फूट पाणी साचल्याने पिके पिवळी पडून कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या अतिवृष्टीचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता शेतकऱ्यांची घरे, गोठे, जनावरे, विहिरी तसेच रस्ते देखील गंभीरपणे बाधित झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर शेतकरी प्रशासनासमोर खालील प्रश्न उपस्थित करीत आहेत—

1. नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात येणार आहेत का?

2. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व विमा लाभ कधी मिळणार?

3. उभ्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शासन कोणत्या तातडीच्या उपाययोजना करणार?

4. जनावरांसाठी चारा, पाणी तसेच घरांमध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथके कधी तैनात होणार?

5. सलग दोन वर्षे ओल्या दुष्काळाचा फटका बसत असल्याने सिंदखेडराजा तालुक्याला स्थायी ओला दुष्काळग्रस्त क्षेत्र घोषित करण्याचा शासनाचा काही विचार आहे का?

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की गंभीर परिस्थिती असूनही प्रशासन त्यांच्या प्रश्नांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याची खंत ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!