छत्तीसगढ़टॉप न्यूज़दिल्ली NCRदुनियादेशपंजाबबिहारमध्य प्रदेशमहाराष्ट्रयूपीराजस्थान

रस्त्याच्या अभावी आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा बैल दगावला – अजून किती बैलांचा बळी

“रस्त्याच्या अभावी आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा बैल दगावला – अजून किती बैलांचा बळी सरकारला घ्यायचाय?”

शेतकरी न्युज चे मुख्य संपादक श्री बालाजी सोसे

किनगाव राजा लेंडी ते जुना राहेरीबु रस्ता ( पांदी वाट) असं करा भाऊ बाकी पूर्ण बरोबर आहे

 

किनगाव राजातील जुना राहेरी बुद्रुक रस्ता पादी वाट लेंडी – शिव रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दयनीय अवस्थेत आहे. दररोज किमान 100 शेतकरी या रस्त्याने ये-जा करतात, पण हा रस्ता पहिल्यापासून चिखलातच अडकलेला आहे.

खडीकरणाचं काम मंजूर झालं होतं, पण फक्त मातकाम करून काम दोन वर्षांपासून निधीअभावी रखडलंय.

पावसाळा आला की रस्त्यावर प्रचंड चिखल होतो, गाड्या अडकतात, 150–200 लिटर दूध दररोज धोक्यात.

याच कारणामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला दूध व्यवसाय बंद केला.

शेतकरी बैलगाडीने दूध घेऊन जाताना, बैल चिखलात घसरून गाडीतून पडतो, गाडी रिकामी उडल्या जात नाही.

या हलगर्जीपणाचा थेट बळी – 5 सप्टेंबर 2024 रोजी शेतकरी गणेश माधवराव काकड यांचा बैल मृत्युमुखी.

प्रश्न असा की अजून किती बैलांचा बळी सरकारला हवाय? शेतकरी आयुष्याने कंटाळून बसायचा का?

या रस्त्यावरून फक्त शेतकरीच नाही, तर मातंग समाजासह सर्व गावकरी त्रास सहन करत आहेत.

मागणीसाठी पत्रं दिली, पाठपुरावा झाला; पण सत्तांतर व निधीअभावी काम रखडलंय, ठेकेदारांकडूनही काम थांबवलं गेलं.

संपूर्ण गावाचा जीव या रस्त्यात अडकलेला आहे. सरकारने तातडीने या रस्त्याचं काम पूर्ण करावं. अन्यथा शेतकरी आंदोलनाशिवाय पर्याय नाही. अशी माहिती किनगाव राजे येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकर्ते श्री रमेश काकड यांनी शेतकरी न्यूज शी बोलताना सांगितले

 

शेतकरी बांधवांचा सवाल :

“आम्ही शेतकरी जगायचं का मरायचं?”

इशारा : या रस्त्याकडे जर सरकारने लक्ष दिलं नाही, तर गावकऱ्यांसोबत शेतकरी योद्धा कृती समिती ठामपणे उभी राहील आणि आगामी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवेल.

निर्धार :

“आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही बोलणार!

शेतकऱ्यासाठी 24 तास शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभं राहण्याचा निर्धार

शेतकरी योद्धा कृती समितीने घेतला आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!