वेळ संपली तरी दादा उठले नाही… शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी थांबलेले ते क्षण आज आठवणीतील वेदना बनले
दादांना भावपूर्ण श्रद्धांजली

वेळ संपली तरी दादा उठले नाही… शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी थांबलेले ते क्षण आज आठवणीतील वेदना बनले
बुलढाणा | प्रतिनिधी, गजानन सुनुणे
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कायम ठामपणे उभे राहिलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या थेट हस्तक्षेपामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा व नैसर्गिक आपत्ती मदतीचा प्रश्न मार्गी लागल्याची आठवण आज शेतकरी वर्गात भावनिकतेने व्यक्त होत आहे.
अन्नत्याग आमरण उपोषणातून मंत्रालयीन बैठकीपर्यंतचा प्रवास
राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांच्या राजवाड्यासमोर
शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकर यांनी
शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी केलेल्या
अन्नत्याग आमरण उपोषणाची गंभीर दखल घेत
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी
२०२४ मध्ये मुंबई मंत्रालयात तातडीची बैठक आयोजित केली.
ही बैठक
शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकर यांच्या अध्यक्षतेखाली
पार पडली.
बैठकीस उपस्थित मान्यवर
या निर्णायक बैठकीला —
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
सिंदखेडराजा मतदारसंघाचे त्यावेळचे विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे
त्यावेळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय मंत्री महोदय दिलीप वळसे दादा (२०२४)
आदर




