गौरव पुरस्कारमहाराष्ट्रयुवाशाळे कॉलेज

बहुजन समाजाला डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक कार्यामुळे नवी दिशा – भैय्यासाहेब पाटील पुसदेकर

तेल्हारा येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती संचालित श्री शिवाजी हायस्कूल, तेल्हारा

बहुजन समाजाला डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक कार्यामुळे नवी दिशा – भैय्यासाहेब पाटील पुसदेकर

    तेल्हारा | प्रतिनिधी : राजेश पाटील खारोडे

तेल्हारा येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती संचालित श्री शिवाजी हायस्कूल, तेल्हारा व श्रीमती पार्वतीदेवी तापडिया कन्या हायस्कूल, तेल्हारा यांच्या संयुक्त विद्यमाने थोर शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दि. २५ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

या उपक्रमांचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा दि. १ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. जयवंतराव उपाख्य भैय्यासाहेब पाटील पुसदेकर (उपाध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती) हे होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारिणी सदस्य प्रा. केशवराव गावंडे, प्रा. सुभाषराव बनसोड, सुरेशदादा खोटरे उपस्थित होते. तसेच आजीव सदस्य प्रा. अण्णासाहेब ढोले, दादासाहेब पाटील, बाळासाहेब पाटील, साहेबराव सोनमाळे, अॅड. विश्वासराव नेरकर, रमेश पाटील कोकाटे, शोएब अली मिरसाहेब, माधवराव खोटरे, पुरुषोत्तम पाटील दहे, नारायण देवतळे यांच्यासह विशेष निमंत्रित शाळा समिती सदस्य सुधीर बापू देशमुख, शामशिल भोपळे, शाळा तपासणी अधिकारी उद्धवराव विखे, अनिल भाऊ भोपळे, प्राचार्य डॉ. गोपाळ ढोले, प्रा. उदय देशमुख, मुख्याध्यापक विलास गावंडे, मुख्याध्यापिका सौ. विद्याताई देशमुख, बाळासाहेब सरनाईक (अकोला), धनंजय भंगाळे (जयंती उत्सव प्रमुख), सुनील वंजारी (शिक्षक प्रतिनिधी), विजय दहे (शिक्षकेतर प्रतिनिधी), विद्यार्थी प्रतिनिधी आकाश गवारगुरु, रोहित वानखडे, कु. आरती तायडे, प्रज्ञा गवारगुरु आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थित सर्व आजीव सदस्यांचा श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीच्या कार्यकारिणी मंडळाच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विलास गावंडे यांनी केले. प्रा. सुभाषराव बनसोड, प्रा. केशवराव गावंडे व सुरेशदादा खोटरे यांनी आपल्या मनोगतातून मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात भैय्यासाहेब पाटील पुसदेकर यांनी सांगितले की, “डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी शिक्षणासाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य झोकून देत एक मोठा लढा उभा केला. त्यांच्या या शैक्षणिक योगदानामुळे बहुजन समाजाला शिक्षणाची वाट मिळाली आणि समाजाला नवी दिशा प्राप्त झाली,” असे मोलाचे विचार त्यांनी व्यक्त केले.

यानंतर क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, रंगभरण स्पर्धा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांतीकुमार सावरकर यांनी तर आभार प्रदर्शन सुनील वंजारी यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शांतीकुमार सावरकर, सुनील वंजारी, बळीराम कुवारे, तुषार जाधव, अंकेश भांबुरकर, बी. जी. पवार, धनंजय भंगाळे, भारत भोयर, श्रीधर लोखंडे, गाढवे सर, अभिजित हिंगणकर, सौ. शर्वरी हिंगणकर, कु. प्रियंका नंदाने मॅडम, गजानन गावंडे, विजय दहे, तेजराव कडू तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

या प्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचेदेखील आयोजन करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!