मंगरुळपीर तालुक्यातील श्री संत झोलेबाबा यात्रा महोत्सव ४ जानेवारीला संपन्न होणार
भव्य महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर

मंगरुळपीर तालुक्यातील श्री संत झोलेबाबा यात्रा महोत्सव ४ जानेवारीला संपन्न होणार
वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे
भव्य महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून गेल्या १० वर्षापासून अखंड सुरू असलेली सेवा यावर्षी सुद्धा श्री संत झोलेबाबा यात्रा महोत्सव निमित्त आयोजित करण्यात आली आहे, ०४ जानेवारी रोजी सदर भव्य महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन केले आहे , १६ तज्ञ डॉक्टर ची पूर्ण टीम तपासणीसाठी उपलब्ध असणार आहे, विशेष म्हणजे औषध सुद्धा मोफत दिल्या जाणार आहे.
विठ्ठल हॉस्पिटल ची सर्व टीम त्यामध्ये डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे, डॉ. मधुकर बोरकर, डॉ. सूरज जाधव, डॉ. गजानन पोफले पाटील, डॉ. उमेश भुतेकर, डॉ. अर्चना बोरकर हे उपलब्ध असतील त्यासह डॉ. तुकारामजी धोटे मेमोरियल हॉस्पिटल चे डॉ. नितीन धोटे, डॉ.प्रविण धोटे, डॉ. ऋचा धोटे हे उपलब्ध असतील त्यासहश्री हॉस्पिटल चे डॉ. सुबोध महल्ले, डॉ आशिष बालकृष्ण राऊत, नेत्ररोग तज्ञ डॉ. जुगल चिरनिया, डॉ. अश्विनी गव्हाणे, डॉ. जुगल चीरानिया, स्किन स्पेशालिस्ट डॉ. उमेश ठोंबे, डॉ. उमेश सपकाळ, दंतरोग तज्ञ डॉ. कमलेश सपकाळ, फिजिओथेरपी डॉ. उन्नती मिलिंद पाकधने, पंचकर्म चिकित्सा डॉ. पपिता वऱ्हाडे हे सर्व तज्ञ डॉक्टर उपलब्ध असतील, रक्त तपासणी साठी ◆ ECG, शुगर, बीपी सह इतर सर्व तपासण्या मोफत होतील, त्यासह रुग्णांना मोफत ऑपरेशन साठी परिपूर्ण सहकार्य करण्यात येईल अशी माहिती रुग्णसेवा ग्रुपचा आयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी दिली. त्यासह युवकांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.
मातोश्री लॅब चे सुनिल सावके व मारोती लॅब चे उमेश सुर्वे यांचे विशेष सहकार्य लाभले, रुग्णांना सर्वच सेवा एकाच छताखाली मिळणार आहेत.
आयोजन करण्यासाठी रुग्णसेवा युवा ग्रुपचे सर्व सदस्य त्यासह श्री. संत झोलेबाबा संस्थान चिखली यांच्यासह सर्व भक्तगण यांचे सहकार्य लाभले



