गडचिरोलीजयंतीधर्ममहाराष्ट्रयात्रा महोत्सवविदर्भ

तोडसा येथे जय बाब्बालाई देवीच्या जत्रेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भाग्यश्री (आत्राम) हालगेकर यांची प्रमुख उपस्थिती

एटापल्ली: तालुक्यातील तोडसा येथे पार पडलेल्या जय बाब्बालाई देवीच्या वार्षिक जत्रेला यंदा मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले.

तोडसा येथे जय बाब्बालाई देवीच्या जत्रेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भाग्यश्री (आत्राम) हालगेकर यांची प्रमुख उपस्थिती

            जिल्हा: प्रतिनिधी. तेजेश गुज्जलवार 

एटापल्ली: तालुक्यातील तोडसा येथे पार पडलेल्या जय बाब्बालाई देवीच्या वार्षिक जत्रेला यंदा मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या भाग्यश्री (आत्राम) हालगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे जत्रेला विशेष राजकीय रंग लाभला.

या जत्रेला दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो आदिवासी भाविकांनी उपस्थिती लावली. पारंपरिक श्रद्धा, संस्कृती आणि राजकीय सहभाग यांचा सुंदर संगम या जत्रेत पाहायला मिळाला. भाग्यश्री (आत्राम) हालगेकर यांनी जय बाब्बालाई देवीची विधिवत पूजा-अर्चा करून परिसरातील जनतेच्या सुख-समृद्धी व विकासासाठी प्रार्थना केली.

यावेळी बोलताना त्यांनी आदिवासी समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक परंपरा जपण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. आदिवासी भागातील मूलभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण व रोजगार यासाठी पक्षाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेशजी टिकले, विनोद चव्हाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जत्रेच्या निमित्ताने पक्षाने आदिवासी समाजाशी आपले नाते अधिक दृढ केल्याचे चित्र दिसून आले.

जत्रेचे आयोजन ग्रामस्थ व आयोजन समितीने सुयोग्यरीत्या केले असून या धार्मिक कार्यक्रमातून सामाजिक ऐक्य आणि राजकीय संवादाला चालना मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!