ग्रामपंचायत चिचोंडी खुर्द-बदापूर येथे वर्षा सुरेश मढवई यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड
येवला तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिचोंडी खुर्द-बदापूर येथे उपसरपंच पदासाठीची निवड प्रक्रिया अत्यंत शांततेत,

ग्रामपंचायत चिचोंडी खुर्द-बदापूर येथे वर्षा सुरेश मढवई यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड
नाशिक | येवला प्रतिनिधी : प्रवीण पाटील
येवला तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिचोंडी खुर्द-बदापूर येथे उपसरपंच पदासाठीची निवड प्रक्रिया अत्यंत शांततेत, पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात शासकीय नियमांचे पालन करत पार पडली. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सरपंच शिल्पा मढवई यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.
या निवड प्रक्रियेत वर्षा सुरेश मढवई यांचे नाव उपसरपंच पदासाठी सुचविण्यात आले. त्यांच्या नावाला सर्व सदस्यांनी एकमताने पाठिंबा दिल्यामुळे त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवड जाहीर होताच उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित उपसरपंच वर्षा सुरेश मढवई यांनी ग्रामस्थांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, शिक्षण, महिला व युवकांच्या विकासास प्राधान्य देऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामे राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीला ग्रामपंचायत सदस्य महेश मढवई, संतोष मढवई, अमोल मढवई, आण्णासाहेब मोरे, लहानबाई जाधव, रुपाली मढवई, आशा शेजवळ, आशा मढवई, रामनाथ देवढे हे उपस्थित होते. तसेच गावातील संजय मढवई, सुरेश मढवई, सोमनाथ मढवई, भाऊसाहेब मढवई, समाधान मढवई, बापू मढवई, सचिन मढवई, सोनू मढवई, चंद्रकांत जाधव, नितीन मढवई, किरण मढवई यांच्यासह ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे कामकाज ग्रामविकास अधिकारी सौ. सरिता बिडवे यांनी शासकीय नियमांनुसार पार पाडले. कार्यक्रम शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
नवनिर्वाचित उपसरपंच वर्षा सुरेश मढवई यांच्या निवडीमुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजाला अधिक गती मिळेल व गावाच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.




