आरक्षणपोलीसमहाराष्ट्रविदर्भ

धनगर समाजाला एसटी आरक्षण द्यावे शिरपूर येथे सकल धनगर समाजाचा जाहीर निषेध

धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे,

धनगर समाजाला एसटी आरक्षण द्यावे शिरपूर येथे सकल धनगर समाजाचा जाहीर निषेध

      वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे

धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने आज शिरपूर येथे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाअंतर्गत दुपारपर्यंत शहरातील व्यापारपेठ बंद ठेवण्यात आली होती. स्थानिक बसस्थानक परिसरात मोठ्या संख्येने धनगर समाजबांधव एकत्र येऊन शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सध्या धनगर समाजाला एनटी प्रवर्गातून साडेतीन टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, हे आरक्षण अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून देण्यात यावे, अशी ठाम मागणी धनगर समाजाच्या वतीने शासनाकडे करण्यात येत आहे. १९८५-८६ साली यशवंत सेनेच्या माध्यमातून बापूसाहेब कोकरे यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याची मागणी मांडली होती.

केंद्र शासनाच्या यादीत ‘धनगड’ या जातीला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र, ‘धनगड’ आणि ‘धनगर’ या शब्दांतील गोंधळामुळे महाराष्ट्रातील धनगर समाजाचे आरक्षण आजतागायत प्रलंबित असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. धनगर समाजाच्या मते ‘धनगड’ आणि ‘धनगर’ ही एकच जात असून, अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे व शब्दांच्या अपभ्रंशामुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रातील ३३८ तहसील कार्यालयांनी ‘धनगड’ जात अस्तित्वात नसल्याचे पत्र दिले असतानाही आजपर्यंत धनगड जातीचा दाखला कुठेही जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे ‘धनगड’ ही जात अस्तित्वात नसल्याचा दावा धनगर समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शिरपूर बसस्थानक परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी उपपोलीस निरीक्षक तायडे यांच्यामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात डॉ. गजानन ढवळे, नारायणराव बोबडे, पवन गावंडे, सुनील घोडके, मंगेश गावंडे, पंढरी तिरके, गणेश बोबडे, वैभव बोबडे, प्रभाकर खोरणे, गणेश फुके, विजय गावंडे, संतोष घाटोळे यांच्यासह मोठ्या संख्येने सकल धनगर समाजबांधव सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!