छत्रपती शिवाजी महाराजजय जिजाऊजयंतीबुलढाणामहाराष्ट्रमहाराष्ट्र माता जिजाऊ मासाहेबमहिलाविदर्भसावित्रीबाई फुलेसिंदखेड राजा

लखुजीराजे जाधवांच्या वंशजाच्यावतीने जिजाऊंना सनई चौघड्यांच्या निनादात अभिवादन 

राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब याचां ४२८ व्या जन्मोत्सव सोहळा त्यांचे जन्मस्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील

लखुजीराजे जाधवांच्या वंशजाच्यावतीने जिजाऊंना सनई चौघड्यांच्या निनादात अभिवादन

           प्रा दिलीप नाईकवाड बुलढाणा 

राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब याचां ४२८ व्या जन्मोत्सव सोहळा त्यांचे जन्मस्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे मोठ्या भक्ती भावात आणि उत्साह साजरा करण्यात आला या सोहळ्याला राज्यासह देशातील विविध प्रांतातून हजारोंच्या संख्येने जिजाऊ भक्त राष्ट्रमातेच्या चरणी नतमस्तक झाले.सिंदखेड राजाचे नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनी दर्शन घेतले

सूर्योदयापूर्वी पहाटे पाच वाजता पासूनच जन्मस्थळी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली जिजाऊंच्या ऐतिहासिक स्मारक असलेला राजवाड्यात अभिषेक पुष्पहार अर्पण करू तसेच इतर धार्मिक विधी पार पडले.याप्रसंगी जिजाऊंच्या जीवनकार्याची त्यांनी दिलेल्या शौर्य आणि आदर्शांची, गौरवगाथा असलेल्या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते स्वराज्य रक्षक शिवछत्रपतीनां घडविणाऱ्या या महान मातेच्या चरणी अभिवादन करण्यासाठी भाविकांनी मोठ्या भक्ती भावाने श्रद्धेने हजेरी लावली होती. जिजाऊ जन्मस्थळ ते जिजाऊ सृष्टी पर्यंत विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी उपक्रम राबविण्यात आले पोवाडे, गावागावातून आलेल्या दिंड्या, किर्तन, ढोल पथक, विविध सांस्कृतिक कार्यक्रम,वारकरी परिषदेच्या ज्योतीताई जाधव यांनी काढलेली मशाल यात्रा, वारकरी दिंडी, फुगड्या, सावित्री- जिजाऊ दशरात्रोत्सवात जीवनावर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दहा दिवस सुरू होते.आमदार मनोज कायंदे यांनी राजवाड्यासमोर तीन दिवस राज्य सरकारच्या द्वारे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यातील अनेक मान्यवर, राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते, शिवभक्त संघटना, महिला बचत गट, शेतकरी वर्ग यांनी या सोहळ्यास उपस्थिती दर्शवली.

 

बॉक्स

 

राजे लखोजीराव जाधव यांच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळावर सकाळी पाच वाजता पूजन,आरती, जिजाऊ जन्माचा पाळणा, म्हंटला यावेळी बालाजी संस्थानचे वंशपरंपरागत विश्वस्त राजे विजयसिंह जाधव सपत्नीक उपस्थित होते, शिवाजी राजे जाधव तसेच प्रा.गोपाळ राजे, सुभाष राजे,आशिष राजे,आनंद राजे,अभिजीत राजे, विकास राजे, सार्थक राजे, यांच्यासह देऊळगाव राजा,किनगावराजा, सिंदखेडराजा,आडगाव राजा, मेहुणा राजा,उमरद, येथील वंशज सपत्नीक, कुटुंबासह उपस्थित राहुल त्यांनी पूजन केले.

 

सुरक्षेचा तगडा बंदोबस्त

 

लाखो शिवभक्त जिजाऊं मासाहेबांच्या दर्शनासाठी येणार असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे स्वतःउपस्थित राहून त्यांनी संपूर्ण सिदंखेडराजा नगरी मध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चोख बंदोबस्त ठेवलेला होता,वाहतूक नियंत्रण, वाहन स्थळ, जिजाऊ जन्मस्थळ ते जिजाऊ सृष्टी,साठी मोफत वाहन व्यवस्था,वैद्यकीय व्यवस्था,पिण्याच्या पाण्याच्या सुविधा ठेवण्यात आलेल्या होत्या, यात मराठा सेवा संघ, स्थानिक स्वयंसेवी संस्था, संभाजी बिग्रेड,तरूण हेही सेवा देण्यात सक्रिय होते. प्रशासनाच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी डॉ.गणेश पाटील,मुख्याधिकारी गुलाबराव खरात, उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, विभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, तहसीलदार अजित दिवटे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजित बांगर,यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्षात उपस्थित राहून सहकार्य केले.जवळपास १ हजारच्या वर पोलीस अधिकारी,पोलीस पुरुष, महिला,कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!