टॉप न्यूज़देशबुलढाणामहाराष्ट्रलोकल न्यूज़शेतीशेती न्यूज

मध्यरात्री SBI बँकेत चोरीचा थरार…स्ट्राँग रूम फोडण्याचा प्रयत्न, मोठा दरोडा टळला!

एटापल्ली | 17 डिसेंबर 2025

मध्यरात्री SBI बँकेत चोरीचा थरार…स्ट्राँग रूम फोडण्याचा प्रयत्न, मोठा दरोडा टळला!

प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार, एटापल्ली

एटापल्ली येथील स्टेट बँक ऑफ इंडिया प्रतिनिधीशाखेत मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी थरार माजवला.

16 डिसेंबरच्या रात्री साधारण 12 वाजता चोरट्यांनी बँकेच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून आत शिरकाव केला.

ग्राहक कक्षातून थेट मॅनेजर कक्षात प्रवेश करत आलमारी फोडली…

महत्त्वाचे दस्तावेज अस्ताव्यस्त केले…

यानंतर चोरट्यांनी थेट स्ट्राँग रूमला लक्ष्य केले!

ग्रील गेटची कुलुपे तोडली,

स्ट्राँग रूम फोडण्याचा जोरदार प्रयत्न केला…

मात्र स्ट्राँग रूम भक्कम असल्याने चोरट्यांचा डाव फसला!

एक पैसाही हाती न लागता चोरटे घटनास्थळावरून पसार!

सकाळी बँक उघडल्यानंतर एटीएमच्या समोरील दार तोडलेले आढळून आले.

तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच एटापल्ली पोलीस घटनास्थळी दाखल…

फॉरेन्सिक लॅब, फिंगर प्रिंट तज्ञ आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने सखोल तपास सुरू!

या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गिरवलकर करत आहेत.

बँकेतील मजबूत सुरक्षेमुळे मोठा दरोडा टळल्याचे स्पष्ट!

एटापल्लीकरांनो, सावध रहा…

पोलिसांचा तपास सुरूच आहे!

सविस्तर करून द्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!