टॉप न्यूज़देशपंजाबबुलढाणामहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़शेतीशेती न्यूज

वाशिम जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सरकारचे हजारो कोटी रुपये जाहीर; वाशिमचा बळीराजा मात्र मदतीपासून वंचित*

*वाशिम जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सरकारचे हजारो कोटी रुपये जाहीर; वाशिमचा बळीराजा मात्र मदतीपासून वंचित*

वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे

वाशिम जिल्ह्यात सरकारने अतिवृष्टीसाठी ३१,६२८ कोटींचे भव्य पॅकेज जाहीर करूनही वाशिम जिल्ह्यातील वाशिम रिसोड मानोरा मंगरुळपीर मालेगाव कारंजा (लाड) या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना मदतीची रक्कम अद्याप मिळालेली नाही.

सोयाबीन, कापूस, तूर व उडीद पिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना प्रति हेक्टर १८,५०० ते ३२,५०० रुपये व रब्बी बियाणे अनुदान कागदावरच अडकले आहे. पंचनामे व अर्ज पूर्ण असूनही VK क्रमांक आणि e-KYC प्रक्रियेच्या अडथळ्यामुळे DBT थांबले असून शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने वितरणाचे निर्देश दिल्याचे सांगितले जात असले, तरी स्थानिक पातळीवर प्रशासनाची संथ गती शेतकऱ्यांच्या संतापास कारणीभूत ठरत आहे. रब्बी पेरणीचा हंगाम संपत असताना “घोषणा भरपूर, मदत शून्य” असा राजकीय टोला शेतकऱ्यांकडून लगावला जात असून, प्रक्रिया त्वरित पूर्ण न झाल्यास शेतकऱ्याकडून आंदोलनाचा इशाराही दिला जात आहे. त्वरित संबंधित अधिकाऱ्यांने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावे अशी मागणी शेतकरी करीत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!