वाशिम पोलिस स्टेशन येथे भाजपच्या नेत्यांनी काँग्रेस आमदारासह दोघांविरोधात पोलिसांत केली तक्रार
वाशिम जिल्ह्यात राजकीय संघर्षाने अत्यंत खालची पातळी

वाशिम पोलिस स्टेशन येथे भाजपच्या नेत्यांनी काँग्रेस आमदारासह दोघांविरोधात पोलिसांत केली तक्रार
वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे
वाशिम जिल्ह्यात राजकीय संघर्षाने अत्यंत खालची पातळी गाठल्याचा गंभीर आरोप करत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा निवडणूक प्रमुख, माजी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राजु पाटील राजे यांनी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि वाशिम येथील हरीश गोवर्धनदास सारडा यांच्याविरोधात वाशिम शहर पोलीस ठाण्यात सविस्तर लेखी तक्रार दाखल केली आहे.
सोशल मीडियावर सातत्याने बदनामी, कुटुंबीयांची नावे वापरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणे तसेच पत्रकारांमार्फत खोट्या गुन्ह्यांची माहिती पसरवून सामाजिक प्रतिष्ठा उद्ध्वस्त करण्याचा जाणीवपूर्वक कट रचल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. असल्याचे नमद करण्यात आले आहे. माझ्यावर गंभीर स्वरूपाचे खोटे आरोप पोलिस स्टेशन वाशिम (शहर )
या प्रकरणामुळे वाशिम जिल्ह्यात
राजु पाटील राजे हे वाशिम शहरातील नामांकित व्यावसायिक असून त्यांचा स्थावर मालमत्तेचा व्यवसाय आहे आणि वाशिम येथे स्वतःचे शोरूमही आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. ते भाजपचे माजी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष तसेच प्रदेश युवा मोचचेि उपाध्यक्ष राहिले असून, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष असताना त्यांच्या नेतृत्वाखाली दोन विधानसभा आमदार निवडून आले आहेत. प्रामाणिकपणा, निष्ठा व संघटनकौशल्य यासाठी त्यांची समाजात स्वतंत्र ओळख व प्रतिष्ठा आहे. तक्रारीनुसार, हरीश सारडा है गेल्या तीन ते चार वर्षांपासून सोशल मीडियावर सातत्याने राजु पाटील राजे यांच्याविरोधात बदनामीकारक पोस्ट टाकत आहेत. सुरुवातीला हा प्रकार राजकीय टीकेपुरता मर्यादित असल्याने दुर्लक्ष करण्यात आले. मात्र अलीकडे तक्रारदाराची पत्नी, दिवंगत आई व कुटुंबीयांची नावे वापरून अत्यंत आक्षेपार्ह व मानहानीकारक मजकूर प्रसारित करण्यात येत असल्याने सामाजिक प्रतिष्ठेला तडा गेला असून मानसिक छळ सहन करावा लागत या बदनामी मोहिमेला आणखी गंभीर वळण देत, दिनांक २८ डिसेंबर २०२५ व ३१ डिसेंबर २०२५ रोजी काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, राजु पाटील राजे यांच्याविरोधात बनावट नोटांच्या व्यवसायासंदर्भात एफआयआर दाखल झाल्याचे विधान केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, अशी कोणतीही एफआयआर अस्तित्वात नसताना, कोणतीही शहानिशा न करता जबाबदार लोकप्रतिनिधीने अशी माहिती देणे म्हणजे समाजात भीती, संभ्रम व गैरसमज निर्माण करून जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. “कोणताही पुरावा नसताना
करून माझी सामाजिक, राजकीय व व्यावसायिक प्रतिमा उद्ध्वस्त करण्याचा हा कट आहे. हा प्रकार केवळ माझ्या वैयक्तिक प्रतिष्ठेवर हल्ला नसून लोकशाही मूल्ये व सार्वजनिक जीवनाच्या शुचिता यांना धक्का देणारा आहे,” असे तक्रारदाराने नमूद केले आहे. तक्रार देताना राजू पाटील राजे यांच्यासोबत आमदार शाम खोडे, शहराध्यक्ष मनीष मंत्री, नगरसेवक अनिल ताजने, नगरसेवक राहुल तुपसांडे, रामभाऊ ठेंगडे, शंकरराव वानखेडे, संतोष वानखेडे, आदिसह बहुसंख्या भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवून राजकीय सूड उगवण्याचे प्रकार किती धोकादायक व गंभीर होत चालले आहेत, याचे हे ठळक उदाहरण असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. सदर तक्रारीची प्रत पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनाही सादर करण्यात आली आहे. वाशिम शहर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून, पुढील कायदेशीर कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.




