अखंड हरिनाम सप्ताहजय गजाननजयंतीधर्ममहाराष्ट्रविदर्भसांप्रदायिक

श्रींच्या प्रगट दिनाची तयारी! जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाचा प्रेरणादायी सेवाभावी उपक्रम

श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र प्रगट दिनानिमित्त कारंजा नगरीत गेल्या अनेक वर्षांपासून अखंडितपणे सेवा

श्रींच्या प्रगट दिनाची तयारी! जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाचा प्रेरणादायी सेवाभावी उपक्रम

वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे कारंजा (लाड) 

श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र प्रगट दिनानिमित्त कारंजा नगरीत गेल्या अनेक वर्षांपासून अखंडितपणे सेवा, भक्ती व सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असलेले जय भवानी जय मल्हार गोंधळी वारकरी मंडळ, कारंजा यांचा सेवाभावी उपक्रम यंदाही भाविकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

सन २०१५ पासून आजतागायत सलग अकरा वर्षे श्री संत गजानन महाराज मंदिर, शहर पोलीस स्टेशन, कारंजा नगरी येथील पालखी व शोभायात्रेत निष्काम भावनेने सेवा देणारे हे मंडळ, निष्काम कर्मयोगी सुरेशराव ठाकरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सेवाभावी वारकरी संजय कडोळे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने कार्यरत आहे. या सेवाकार्यात महर्षी वाल्मिकी महिला भजनी मंडळ, दिघी यांचेही मोलाचे योगदान लाभत आहे.

यावर्षी श्री संत गजानन महाराजांचा प्रगट दिन माघ वद्य सप्तमी, रविवार दि. ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरा करण्यात येणार असून, त्याच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून

“तय्यारी श्रींच्या प्रगट दिनाची! जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाची!!”

या शीर्षकाखाली एक भव्य व सेवाभावी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमांतर्गत वैकुंठधाम निवासी मातोश्री सौ. स्नेहलताबाई पूनमचंदजी सोमाणी यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ, भारत सरकार युवा पुरस्कार प्राप्त, सेवाव्रती पत्रकार व तरुण क्रांती मंच, वाशिमचे अध्यक्ष निलेशजी सोमाणी यांच्या शुभहस्ते १८ पुरुष व १८ महिलांना वारकरी गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे. यामुळे वारकरी संप्रदायातील भाविकांना भक्तीभाव अधिक दृढ करण्यास प्रेरणा मिळणार आहे.

तसेच स्व. उमेश कडोळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, दुर्गाबाई कडोळे यांच्या वतीने तुळशी वृंदावन घेणाऱ्या मातोश्रींना पैठणी साडीचे वाटप करण्यात येणार असून, या उपक्रमामुळे सामाजिक कृतज्ञतेचा आणि संस्कृतीचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे.

हा संपूर्ण उपक्रम महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाजसेवक व जय भवानी जय मल्हार गोंधळी वारकरी मंडळ, कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांच्या पुढाकारातून साकारत असून, त्यांच्या सेवावृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर कार्यक्रम

मंगळवार, दि. २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता,

श्री संत गजानन महाराज मंदिर, कारंजा येथे मोठ्या भक्तिभावात संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाला निष्काम सेवाधारी सुरेशराव ठाकरे गुरुजी, सेवाधारी गजाननराव पाटील कडू, मिंटूभाऊ सागाणी, नगरसेविका श्रीमती कुसुमताई अघम, नगरसेविका सौ. चंदाताई कोळकर, कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला, तसेच पत्रकार अमोल अघम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

तरी जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाच्या सर्व वारकरी माता-भगिनी व वारकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सेवाभावी व भक्तीमय कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक सेवाव्रती संजय कडोळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!