शेलूबाजार येथे खोटे दस्तऐवज तयार करून ओपन स्पेस मालमत्ता घोटाळा; तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी
शेलूबाजार – जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या शेलूबाजार येथे

शेलूबाजार येथे खोटे दस्तऐवज तयार करून ओपन स्पेस मालमत्ता घोटाळा; तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी

वाशिम जिल्हा प्रतिनिधी – विश्वास कुटे
शेलूबाजार – जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या शेलूबाजार येथे ग्रामपंचायतीच्या काही पदाधिकाऱ्यांनी व संबंधित खरेदी-विक्री करणाऱ्यांनी संगनमताने खोटे शासकीय कागदपत्रे तयार करून ओपन स्पेस जागेचा मोठा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे रवी लांभाडे यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत व दिलेला बांधकाम परवाना रद्द करावा, अशी मागणी त्यांनी तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार, शेलूबाजार वार्ड क्रमांक एक मध्ये १९८८ साली मंजूर झालेल्या लेआउटमधील ओपन स्पेस जागा आजच्या घडीला प्रति स्क्वेअर फूट सुमारे ३००० रुपये बाजारभावाची आहे. हीच मौल्यवान जागा आर्थिक फायदा मिळवण्याच्या वाईट हेतूने साध्या बॉण्डवर प्रतिज्ञापत्र लिहून ६० बाय ६० म्हणजेच ३६०० स्क्वेअर फूट ओपन स्पेस जागा एका खाजगी व्यक्तीच्या नावावर बेकायदेशीरपणे दाखवण्यात आली. शेलूबाजार ग्रामपंचायतीच्या मालमत्ता रजिस्टरमध्ये मालमत्ता क्रमांक १३८६ अशी खोटी नोंद करून दिनांक ८ सप्टेंबर २०२१ रोजी नं. ८-अ खरेदीसाठी खोटे शासकीय कागदपत्र तयार करण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे संबंधित बॉण्ड हा दिनांक ३ सप्टेंबर २०२१ चा असून त्याच दिवशी ८-अ वर नोंद आहे आणि ८ सप्टेंबर २०२१ रोजी ओपन स्पेस जागेची खरेदीही करण्यात आली. मात्र ग्रामपंचायतीची त्या महिन्याची मासिक सभा २७ सप्टेंबर २०२१ रोजी झाल्याने हा संपूर्ण प्रकार ग्रामसभेपासून



