कॉलेज शाळातपोवननाशिकमहाराष्ट्रयुवाशाळे कॉलेज

चिचोंडी बुद्रुक येथील बालआनंद मेळाव्यातून घडली संस्कारांची आणि सामाजिक जाणिवेची पेरणी

चिचोंडी बुद्रुक येथील पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये शनिवारी दि. १० रोजी बालआनंद मेळावा अत्यंत उत्साहात

चिचोंडी बुद्रुक येथील बालआनंद मेळाव्यातून घडली संस्कारांची आणि सामाजिक जाणिवेची पेरणी

       नाशिक येवला प्रतिनिधी : प्रवीण पाटील

चिचोंडी बुद्रुक येथील पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये शनिवारी दि. १० रोजी बालआनंद मेळावा अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. केवळ पुस्तकी शिक्षणापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, जीवनकौशल्य, पैशांची देवाण-घेवाण, नियोजन व आत्मविश्वास यांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमामागे लहान वयातच मुलांमध्ये जबाबदारीची जाणीव, गणिती संकल्पना सोप्या पद्धतीने रुजवणे आणि भविष्यात समाजोपयोगी नागरिक घडविण्याचा व्यापक दृष्टिकोन असल्याचे संतोष बुधवंत सर यांनी सांगितले. उपशिक्षक सुनील बागले सर, शिक्षिका मीना पवार, शालिनी सूळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी भाजीपाला, खाऊचे पदार्थ, चणे मसाला, सोनपापडी, पापड तसेच चुलीवरचा खास चहा अशा विविध वस्तूंचे स्टॉल लावले.

“भाजी घ्या… कांदे घ्या… चहा घ्या…” अशा बालगोपालांच्या किलबिलाटाने संपूर्ण परिसर जणू आठवडी बाजारासारखा फुलून गेला होता. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, शिस्तबद्ध व्यवहार आणि आनंद पाहून पालकही भारावून गेले.

या उपक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रावण मढवई, उपाध्यक्ष गणेश गोसावी, सर्व सदस्य, माजी विद्यार्थी रवींद्र गुंजाळ, मेजर गणेश मढवई, संतोष भोरकडे, नागेश मढवई, राजाराम घोटेकर, तलाठी सविता धिवर मॅडम, अंगणवाडी सेविका व मदतनीस, शालेय पोषण आहार कर्मचारी कविता पाटील, प्रवीण पाटील तसेच ज्येष्ठ नागरिक माधव मढवई, बाबासाहेब पानगव्हाणे, ज्ञानेश्वर गुंजाळ, पोस्टमन अरुण गुंजाळ, भरत गुंजाळ आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशा उपक्रमांमधून केवळ विद्यार्थ्यांचेच नव्हे तर संपूर्ण गावाचे सामाजिक भान अधिक मजबूत होत आहे. शिक्षण, संस्कार आणि समाजकार्य यांची सांगड घालणारे हे प्रयत्न भविष्यात व्यापक परिवर्तनाची नांदी ठरतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. समाजाच्या सर्व स्तरांनी या सकारात्मक कार्याची दखल घेत पुढेही असे उपक्रम बळकट व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

नाशिक येवला प्रतिनिधी प्रविण पाटील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!