घातपातपाऊसपाणीबुलढाणामहाराष्ट्रमहिलाविदर्भसामाजिक कार्यकर्तेसिंदखेड राजा

जीव धोक्यात घालून जीव वाचवणाऱ्या ‘त्या’ निर्जला सोनुने यांचा गौरव केवळ शाल-श्रीफळापुरताच का?

राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रशासन पुढे येणार का? — नागरिकांचा सवाल

जीव धोक्यात घालून जीव वाचवणाऱ्या ‘त्या’ निर्जला सोनुने यांचा गौरव केवळ शाल-श्रीफळापुरताच का?

राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रशासन पुढे येणार का? — नागरिकांचा सवाल

  दुसर बीड (ता. सिंदखेडराजा) : विशेष प्रतिनिधी

समाजात आजही माणुसकी जिवंत आहे, याचा प्रत्यय जीवन विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, दुसर बीड येथे २४, २५ व २६ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन, आनंद मेळावा, महिला मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमातून आला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांचा सर्वांगीण विकास घडवणे आणि समाजातील आदर्श व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणे, हा या सोहळ्याचा खरा उद्देश होता.

स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मा. दिपकजी मांटे (सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, नागपूर) व मा. जगनजी मुंडे (उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक, जि. प. बुलढाणा) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मा. जीवनराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास लो. शि. संस्थेचे अध्यक्ष मा. मुकुंदराव देशमुख, सचिव मा. गणेशराव राजे जाधव, ग्रामपंचायत सदस्य, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, समूहगायन, देशभक्तीपर गीत, वक्तृत्व अशा विविध कार्यक्रमांतून उपस्थितांची मने जिंकली. आनंद मेळावा व महिला मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मात्र, या स्नेहसंमेलनात सर्वांचे लक्ष वेधून घेतला तो निर्जला गजानन सोनुने यांच्या अतुलनीय धाडसाने.

दिनांक ३० जुलै रोजी शेजारच्या व्यक्तीला पाण्याची मोटार सुरू असताना विद्युत करंट लागला. त्या क्षणी कुणीही पुढे येण्यास घाबरत असताना, निर्जला सोनुने यांनी स्वतःच्या जीवाची कसलीही पर्वा न करता तत्काळ धाव घेतली आणि त्या व्यक्तीचा प्राण वाचवला. या धाडसी प्रसंगी पत्रकार गजानन सोनुने यांनीही मदतकार्य केले.

या दोघांचा विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. भांगे सर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

परंतु आता नागरिकांमध्ये एकच प्रश्न घुमतो आहे —

👉 असा जीवघेणा प्रसंगात प्राणाची बाजी लावून दुसऱ्याचा जीव वाचवणाऱ्या महिलेला केवळ शाल-श्रीफळापुरताच सन्मान पुरेसा आहे का?

👉 निर्जला गजानन सोनुने यांचे धाडस राज्याला आदर्श ठरणारे नाही का?

👉 अशा कर्तृत्ववान महिलेला राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविणे ही प्रशासनाची जबाबदारी नाही का?

आज समाजात महिलांच्या सुरक्षिततेबाबत, धैर्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असताना, निर्जला सोनुने यांचे कृत्य ‘नारी शक्ती’चे जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदयांनी याची दखल घेऊन, राज्य शासनाकडे शिफारस करून निर्जला गजानन सोनुने यांना राज्यस्तरीय शौर्य/सामाजिक पुरस्कार मिळवून द्यावा, अशी ठोस आणि जोरदार मागणी आता सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.

या वेळी सांस्कृतिक प्रमुख ज्ञानेश राजेजाधव, संमेलन प्रमुख जि. ओ. देशमुख, प्रा. तरवदे, प्रा. काकडे, नितीनराव देशमुख, पि. टी. आय. जि. एस. देशमुख, प्रा. निकम, शिर्के सर, सौ. हुसे मॅडम, विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

सूत्रसंचालन करताना डी. जी. राजेजाधव यांनी जिजाऊ, सावित्रीबाई फुले, माता रमाई, अहिल्यादेवी होळकर व फातेमाबी यांच्या आदर्शाचा उल्लेख करत महिलांनी समाजात निर्भीडपणे उभे राहावे, असे भावनिक आवाहन केले.

आज प्रश्न एवढाच आहे —

निर्जला सोनुने यांचे धाडस इतिहासात नोंदवले जाणार का,

की ते एका कार्यक्रमापुरतेच मर्यादित राहणार?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!