पाटसुल रेल्वे येथे मोफत भव्य महाआरोग्य शिबिराला हजारो रुग्णांचा प्रतिसाद
प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुढाकारातून यशस्वी आयोजन

पाटसुल रेल्वे येथे मोफत भव्य महाआरोग्य शिबिराला हजारो रुग्णांचा प्रतिसाद
प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुढाकारातून यशस्वी आयोजन
प्रतिनिधी : विशाल गवई, अकोला
बुधवार दिनांक ७ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम, पाटसुल रेल्वे येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मोफत भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील तसेच दूरदूरच्या गावांतील हजारो गरजू रुग्णांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिराचे आयोजन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप वसु यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शिबिराच्या सुरुवातीला सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते स्व. याची हिदायत पटेल यांना उपस्थित मान्यवरांच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महाआरोग्य शिबिरात सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध आजारांवर तपासणी, सल्ला व उपचार करण्यात आले. विशेषतः डोळ्यांच्या आजाराने त्रस्त रुग्णांसाठी मोठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. शिबिरात तपासणी झालेल्या रुग्णांपैकी दिनांक १० रोजी डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी पहिली बस थेट पाटसुल रेल्वे आश्रम येथून रवाना होणार असून, सर्व रुग्णांना वर्धा येथील सावंगी रुग्णालयात नेण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेनंतर संबंधित रुग्णांना सुरक्षितपणे पुन्हा त्यांच्या गावात परत आणण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.
हे महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे गणेश गावंडे, शेखर साबळे, निखिल दोड यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच शिबिरात सुशील पुंडकर, डॉ. गजानन महल्ले, दयाराम धुमाळे, बंडू वाघोडे, विठ्ठल नारे, योगेश गायकवाड, सुखदेव डिक्कर, जीवन खवले, ज्ञानेश्वर दहीभात, अतुल गावंडे, सुमेध बागलकर, मंगेश राऊत, माधव डिक्कर, शुभम नारे, राहुल देशमुख, ओम भिसे, प्रतीक भिसे, पवन डिक्कर, बिट्टू रोडे, गोपाल गायकवाड, राजू काळे, रोशन दिवनाले, सागर पुंडकर, अंकुश ढगे, रोहित गाडेकर, योगेश शिरसाठ, अनिल तायडे, जयकुमार गाडे, संदीप पाचमासे, गौरव गोटे, प्रशांत चौधरी, सुशांत भिसे, ऋषिकेश भिसे, विठ्ठल वसु, आकाश भिसे, सुरेंद्र गावंडे, निवृत्ती वानखडे तसेच सुखदास महाराज गाडेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
याशिवाय परिसरातील आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून हे महाआरोग्य शिबिर अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले.




