पाणीबुलढाणामहाराष्ट्रविदर्भशेतकरीशेतीशेती न्यूजसरकारी योजनासिंदखेड राजा

राहेरी बु. येथील शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून अद्यापही वंचितच?

सिंदखेडराजा तालुक्यात ऑगस्ट–सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या सततच्या अतिवृष्टी व काही ठिकाणी ढगफुटी

राहेरी बु. येथील शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून अद्यापही वंचितच?

शासनाची घोषणा हवेतच; शेतकरी मात्र अडचणीत

            प्रा. दिलीप नाईकवाड बुलढाणा

सिंदखेडराजा तालुक्यात ऑगस्ट–सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या सततच्या अतिवृष्टी व काही ठिकाणी ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली होती. “दिवाळीपूर्वी मदत देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू” अशी ग्वाही देण्यात आली होती. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना ही मदत मिळाली देखील; मात्र राहेरी बुद्रुक येथील काही शेतकरी आजही या मदतीपासून वंचित असल्याचे वास्तव समोर आले आहे.

राहेरी बुद्रुक येथील शेतकऱ्यांचा आरोप आहे की, संबंधित यंत्रणेच्या हलगर्जीपणा व उदासीनतेमुळे अद्यापपर्यंत अतिवृष्टीची तसेच रब्बी पेरणीसाठी जाहीर केलेली आर्थिक मदत त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शेतकरी आधीच निसर्गाच्या अवकृपेने उद्ध्वस्त झाला आहे. पिके वाहून गेली, खर्च वाढला, उत्पन्न शून्यावर आले; अशा परिस्थितीत शासनाची मदत म्हणजे शेतकऱ्यांसाठी जीवनरेषाच आहे. मात्र तीच मदत कागदोपत्रीच राहात असेल, तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे? प्रशासन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष का करत आहे, हा थेट प्रश्न उपस्थित होत आहे.

या पार्श्वभूमीवर १९ जानेवारी रोजी राहेरी बुद्रुक येथील लाभापासून वंचित शेतकऱ्यांनी आपल्या सह्या असलेले निवेदन तहसीलदार, सिंदखेडराजा यांना सादर केले आहे. यावेळी पंढरी देशमुख, आनंद देशमुख, विठ्ठल देशमुख, धनंजय देशमुख, मिलिंद गवई, भगवान देशमुख, सुभाषराव देशमुख, उल्हास देशमुख, मनोहर देशमुख, दिलीप देशमुख, संकेत इंगळे, श्रीराम सरकटे, पवन सरकटे, आबासाहेब सरकटे आदी शेतकरी उपस्थित होते. निवेदनात अतिवृष्टीची तसेच रब्बी पेरणीसाठी जाहीर केलेली मदत तातडीने वितरित करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.

आज प्रश्न इतकाच आहे — शासनाच्या घोषणा फक्त कागदावरच राहणार का?

शेती व शेतकरी जगणार नसेल, तर गाव, तालुका आणि राज्य कसे जगणार?

शेती आणि शेतकरी वाचवणे ही केवळ योजना नाही, तर शासनाची जबाबदारी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!