संत सावता इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे
हळदी-कुंकू स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न “तीळ आणि गूळ घ्या… गोड गोड बोला…”

संत सावता इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे हळदी-कुंकू स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न
सिंदखेडराजा विशेष प्रतिनिधी
“तीळ आणि गूळ घ्या… गोड गोड बोला…”
या शब्दांप्रमाणेच गोडवा, आपुलकी आणि संस्कृतीचा सुगंध दरवळत होता—सिंदखेडराजा येथील संत सावता इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मातृतीर्थ परिसरात!
दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी संक्रांतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला हळदी-कुंकू व स्नेहमिलन कार्यक्रम हा केवळ एक सण नव्हता, तर परंपरेचा जिवंत वारसा जपणारा सामाजिक संदेश होता. दरवर्षी सालाबाजाप्रमाणे महिला मंडळाच्या पुढाकारातून साजरा होणारा हा कार्यक्रम, यंदा मात्र अधिक भावनिक, अधिक प्रभावी आणि सामाजिक जाणिवा जागवणारा ठरला.
स्वरचित गीतांचे मधुर सूर, उखाण्यांतील हास्य, संगीत खुर्चीतील उत्साह आणि महिलांच्या मनमोकळ्या सहभागामुळे संपूर्ण परिसर आनंदाने फुलून गेला. या स्नेहमय वातावरणात महिलांनी केवळ खेळ खेळले नाहीत, तर नात्यांची वीण घट्ट केली.
कार्यक्रमातील स्पर्धांमध्ये
🥇 प्रथम क्रमांक – छाया अमोल लंबे
🥈 द्वितीय क्रमांक – कर्तव्यदक्ष तहसीलदार सौ. सीमा दिवटे मॅडम
🥉 तृतीय क्रमांक – प्रतिभा झोटे
यांनी पटकावला. विजेत्यांना शाळेच्या संचालिका सौ. जयश्री बळीराम जाधव मॅडम यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमात सहभागी प्रत्येक महिला पालक, प्रमुख पाहुण्या तसेच शाळेतील सर्व महिला शिक्षिकांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले—हीच या कार्यक्रमाची खासियत!
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून
कर्तव्यदक्ष तहसीलदार सौ. सीमा दिवटे मॅडम,
डॉ. रजनी म्हस्के, प्रा. प्रतिभा अतिष तायडे, सौ. सोनल दीपक ठाकरे,
स्त्रीरोगतज्ञ डॉ. शीतल सांगळे मॅडम,
ॲड. कल्याणी राणी अभिजितसिंगराजे जाधव,
डॉ. संगीता मुरकुट
यांची उपस्थिती लाभली. महिला सशक्तीकरण, आरोग्य, कायदेविषयक जाणीव यांवर त्यांनी मनोगत व्यक्त करत हळदी-कुंकू कार्यक्रमाचा सामाजिक अर्थ अधोरेखित केला.
या यशस्वी आयोजनामागे शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बळीराम जाधव सर, संचालिका सौ. जयश्री बळीराम जाधव, शाळा सदस्य शहाजी मेहेत्रे, अभिजित मेहेत्रे, तसेच प्राचार्य प्रा. सुधाकर गोफणे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक व कर्मचारी
कु. वैष्णवी अंभोरे, रुक्मिणी तौर, कु. पायल पवार, दिपाली सातपुते, तेजराव घुगे, मनीष बुंधे
आदींनी विशेष परिश्रम घेतले.
🌸 हा कार्यक्रम एक प्रश्न उपस्थित करतो—
आजच्या धावपळीच्या युगात, मोबाईल आणि सोशल मीडियाच्या दुनियेत हरवत चाललेली हळदी-कुंकूची खरी परंपरा, नात्यांमधील आपुलकी आणि स्त्रीमनाचा सन्मान—हे पुन्हा समाजासमोर मांडण्याचे काम कोण करणार?
उत्तर स्पष्ट आहे—अशाच शैक्षणिक संस्था, अशाच सामाजिक उपक्रमांमधून!
संत सावता इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजने केवळ कार्यक्रम साजरा केला नाही, तर संक्रांतीचा सामाजिक आशय, स्त्रीशक्तीचा सन्मान आणि परंपरेचा जिवंत वारसा पुन्हा एकदा समाजासमोर ठामपणे मांडला.


