राजमाता जिजाऊ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने शालेय साहित्य वाटप…
मुखेड गट चिचोंडी बुद्रुक समता प्रतिष्ठान आदर्श माध्यमिक

राजमाता जिजाऊ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने शालेय साहित्य वाटप…
नाशिक येवला प्रतिनिधी प्रविण पाटील
मुखेड गट चिचोंडी बुद्रुक समता प्रतिष्ठान आदर्श माध्यमिक विद्यालयात श्रेयस प्रकाश पाबळे याचे जन्मदिनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आजोबा रामदास दामोधर पाबळे आण्णा यांनी राजमाता जिजाऊ पहिली महिला शिक्षिका महिलांना शिक्षणाचे दार खुले करुन देणारी
स्वतः शेण, दगड, लाठीमार व निंदकांचे बोलणे ऐकून स्वतःही शिकल्या नी बरोबर मुलींना घेऊन त्यांना शिक्षण देऊन पहिली शाळा सुरु करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती चे औचित्य साधत रामदास आण्णा पाबळे यांनी आपल्या नातवाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुला मुलींना शालेय साहित्य वस्तूंचे वाटप केले. यावेळी गांवचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सामाजिक सेवक गावातील पत्रकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायकवाड सर यांनी केले. वाणी सर यांनी अध्यक्ष व प्रमुख पाहुणे मंचावरील उपस्थित पदाधिकारी यांचे स्वागत अनुमोदन केले.
.. रामदास आण्णा यांनी शालेय वस्तूंचे वाटप करतांना आज खरा दिवस वाटतो आहे. की आमचे पाबळे कुटुंबाकडून ज्यांनी शिवाजी महाराज स्वातंत्र्य साठी घडवले. सावित्रीबाई फुले यांनी स्वतः शिक्षण घेऊन आपल्या साठी पहिल्या महिला शिक्षिका झाल्या. बरोबर मुस्लिम महिला फातेमा यांना सोबत घेउन त्यांना शिक्षिका केले. आणि ज्या महिलेने गौऱ्या थापून हाल अपेष्ठा सहन करुन भिमराव आंबेडकर यांचे शिक्षणाला पैसा पुरवला नी माता जिजाऊ ने छत्रपती घडवले सावित्रीबाई ने महात्मा ची पदवी मिळून दिली माता रमाई ने घटनापती बनवले अश्या महिलांनी आपले,जीवन जगतांना प्रत्येकाला काही ना काही देत राहिल्या तीच संधी आम्ही पाबळे परिवार महान शूरवीर महात्मा यांचे इतिहास डोळे समोर ठेवून आपल्या आताच्या जिजाऊ,सावित्री, रमाई, अहिल्यादेवी घडाव्यात म्हणून जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक सावित्री ला शालेय साहित्य वाटप करण्याचे कार्य आमच्या नातुच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करत आहोत असे बोलून आपले मनोगत व्यक्त केले. माजी तंटामुक्ती अध्यक्ष अर्जुन मढवई यांनी उपस्थित मान्यवर मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी विदयार्थ्यांनी यांचे आभार मानले.
नाशिक येवला प्रतिनिधी प्रविण पाटील




