तेल्हारा तालुक्यात शेतातील पाईप व नोझल चोरी
तेल्हारा तालुक्यातील रायखेड येथील शेतकऱ्याच्या शेतातून अज्ञात इसमांनी मोठ्या प्रमाणावर पाईप व नोझल चोरी

तेल्हारा तालुक्यात शेतातील पाईप व नोझल चोरी
तेल्हारा तालुका प्रतिनिधी राजेश पाटील खारोडे
तेल्हारा तालुक्यातील रायखेड येथील शेतकऱ्याच्या शेतातून अज्ञात इसमांनी मोठ्या प्रमाणावर पाईप व नोझल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. रायखेड येथील निलेश नेमाडे यांच्या शेतातील सुमारे ५० ते ६० पाईप व नोझल दि. २५ जानेवारीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.
चोरट्यांनी केवळ शेतातील साहित्यच नव्हे तर मीटर घरही फोडले असून ठिबक सिंचनाच्या नळ्यादेखील चोरीला गेल्या आहेत. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या प्रकरणी निलेश नेमाडे यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. परिसरात वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.
तेल्हारा तालुका प्रतिनिधी राजेश पाटील खारोडे




