टॉप न्यूज़नगरपरिषदनाशिकराज्यलोकल न्यूज़शेती न्यूज

येवला येथील नगराध्यक्ष उप महाराष्ट्र केसरी राजाभाऊ लोणारी नगरपालिका खुर्चीवर विराजमान होताच सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

येवला–लासलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्री

येवला येथील नगराध्यक्ष उप महाराष्ट्र केसरी राजाभाऊ लोणारी नगरपालिका खुर्चीवर विराजमान होताच सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

      नाशिक – येवला प्रतिनिधी : प्रविण पाटील

येवला–लासलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्री मा. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येवला शहरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल घडून आले. विकासकामांचा ठोस अनुभव, नियोजनबद्ध वाटचाल आणि पुढील काळासाठी स्पष्ट दृष्टीकोन या भक्कम आधारावर येवला नगरपरिषद निवडणूक लढविण्यात आली.

निवडणुकीच्या काळात मा. ना. भुजबळ साहेब प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही, माजी खासदार मा. समीरभाऊ भुजबळ व आमदार मा. पंकजभाऊ भुजबळ यांनी संपूर्ण ताकदीने नेतृत्व करत कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संघटन अधिक बळकट झाले आणि विजय निश्चित झाला.

सुमारे सात वर्षांनंतर डिसेंबर २०२५ मध्ये येवला नगरपरिषदेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीनंतर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, मंगळवार दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी नगरपरिषद कार्यालयात नवनिर्वाचित नगराध्यक्ष उप महाराष्ट्र केसरी श्री. राजाभाऊ लोणारी यांनी अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा कार्यालय प्रवेश सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत पडद्यामागून मोलाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्री. दिलीप अण्णा खैरे यांची साधी व कार्यकर्त्यांशी जोडलेली उपस्थिती. त्यांनी व्यासपीठावर न बसता थेट कार्यकर्त्यांमध्ये बसून कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करून फेटा बांधण्याचा आग्रह धरला असता, “हा विजय माझा नाही, हा आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे. मी तुमच्यासारखाच एक सामान्य कार्यकर्ता आहे,” असे सांगत त्यांनी सुरुवातीला नम्रपणे नकार दिला.

मात्र, उपस्थित कार्यकर्त्यांनी “आपण आमचे सरसेनापती आहात,” अशी भावना व्यक्त करत आग्रह कायम ठेवल्याने अखेर श्री. दिलीप अण्णा खैरे यांनी फेटा स्वीकारला. या क्षणी संपूर्ण परिसरात टाळ्यांचा कडकडाट, घोषणाबाजी आणि विजयाचा उत्साह पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांमधील एकजूट आणि नेतृत्वावरील विश्वास याचे हे जिवंत उदाहरण ठरले.

या प्रसंगी माजी खासदार व ‘किंगमेकर’ म्हणून ओळखले जाणारे मा. समीरभाऊ भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. अंबादास अण्णा बनकर तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष उप महाराष्ट्र केसरी श्री. राजाभाऊ लोणारी यांच्या हस्ते श्री. दिलीप अण्णा खैरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या अथक परिश्रमांबद्दल आणि संघटनात्मक योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

हा सोहळा केवळ पदग्रहणाचा नसून, येवला शहराच्या पुढील विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात असल्याची भावना यावेळी सर्वत्र व्यक्त होत होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!