आंदोलनबुलढाणामहाराष्ट्रमहिलायुवाविदर्भशेतकरीशेतीशेती न्यूजसरकारी योजनासामाजिक कार्यकर्तेसिंदखेड राजा

“पैसे वेळेवर घ्या, सेवा मात्र बंद? सिंदखेडराजात जिओविरोधात पोर्टची लाट”

सिंदखेडराजा, दि. १३ फेब्रुवारी – सिंदखेडराजा शहरासह संपूर्ण तालुक्यात १२ फेब्रुवारी रात्री १२ वाजल्यापासून Reliance Jio चे नेटवर्क पूर्णपणे ठप्प

“पैसे वेळेवर घ्या, सेवा मात्र बंद? सिंदखेडराजात जिओविरोधात पोर्टची लाट”

             विशेष प्रतिनिधी सिंदखेड राजा
सिंदखेडराजा, दि. १३ फेब्रुवारी – सिंदखेडराजा शहरासह संपूर्ण तालुक्यात १२ फेब्रुवारी रात्री १२ वाजल्यापासून Reliance Jio चे नेटवर्क पूर्णपणे ठप्प झाल्याने नागरिक, शेतकरी, व्यापारी व विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. तब्बल २४ तास उलटूनही सेवा सुरळीत न झाल्यामुळे सर्व व्यवहार कोलमडले आहेत.
मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे बँकिंग सेवा, ऑनलाईन व्यवहार, शासकीय योजना अर्ज, शैक्षणिक कामकाज तसेच दैनंदिन संपर्क व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. ग्रामीण भागात तर नागरिकांना आपत्कालीन संपर्क साधणेही कठीण झाले आहे.
याप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया देताना बालाजी सोसे म्हणाले, “सुरुवातीला कंपनीने मोफत सिम देऊन ग्राहक जोडले, आता मात्र दरमहा साडेतीनशे ते चारशे रुपये आकारले जातात. कंपनी पैसे घेताना एक दिवस किंवा एक मिनिटही उशीर सहन करत नाही. मग गेल्या २४ तासांपासून आम्हाला झालेल्या त्रासाला जबाबदार कोण?”
“पैसे वेळेवर, सेवा मात्र शून्य?” – ग्राहकांचा थेट सवाल
ग्राहकांचा ठाम सवाल आहे –
कंपनी एक मिनिटसुद्धा फुकट सेवा देत नाही, मग २४ तास सेवा बंद असताना त्या रिचार्जच्या पैशांचा हिशोब कोण देणार?
या २४ तासांत झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई कोण करणार?
मोबाईलवरच आमचे बँकिंग, व्यवहार, शासकीय कामे, व्यवसाय आणि दैनंदिन संवाद अवलंबून असताना नेटवर्क बंद पडल्याने जे नुकसान झाले, त्याला जबाबदार कोण?
नागरिकांचे म्हणणे आहे की, आजचे संपूर्ण जीवन मोबाईलवर अवलंबून आहे. मोबाईल बंद म्हणजे व्यवहार बंद, संपर्क बंद आणि कामकाज ठप्प. त्यामुळे या सर्व प्रकाराची संपूर्ण जबाबदारी कंपनी व्यवस्थापन आणि कंपनी मालकांवर येते.
पूर्वसूचना न देता सेवा बंद – मोठा निष्काळजीपणा
जर कंपनीला नेटवर्क सेवा बंद करायचीच होती तर किमान २४ तास आधी सर्व ग्राहकांना सूचना देणे आवश्यक होते. एक साधा एसएमएस किंवा कॉलद्वारे माहिती दिली असती तर नागरिक पर्यायी व्यवस्था करू शकले असते. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा बंद केल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
दोन वर्षे मोफत रिचार्ज व कारवाईची मागणी
या प्रकाराबद्दल कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच नागरिकांना झालेल्या त्रासाची भरपाई म्हणून किमान दोन वर्षांचा मोफत रिचार्ज देण्यात यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. अन्यथा संपूर्ण तालुक्यातील ग्राहक मोठ्या प्रमाणावर सिम कार्ड पोर्ट करण्याचा निर्णय घेतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
सिंदखेडराजा तालुक्यात आता स्पष्ट संदेश दिला जात आहे –
“सेवा नसेल तर पैसे नाहीत; नुकसान झाले तर भरपाई हवीच!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!