जयंतीबुलढाणामहाराष्ट्रयुवाविदर्भसांप्रदायिकसामाजिक कार्यकर्तेसिंदखेड राजा

संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

वाघाळा येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत

संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

प्रतिनिधी – वाघाळा | योगेश काकड | लोकनेते न्यूज

वाघाळा येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गावातील प्रमुख मार्गांवर आकर्षक सजावट करण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात, जयघोष करत भव्य आणि दिव्य अशी मिरवणूक गावातून काढण्यात आली.

“श्री संत सेवालाल महाराज की जय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. मिरवणुकीपूर्वी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक वेशभूषेत, लेझीम व ढोल-ताशांच्या तालावर युवक-युवती उत्साहात सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाला सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायदे यांचे बंधू सतीश कायदे यांनी उपस्थित राहून संतांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “संत सेवालाल महाराज यांनी आपल्या समाजात जागृती निर्माण केली. त्यांचे विचार आणि आदर्श आपण कायम आपल्या मनात जपले पाहिजेत.”

तसेच सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर व त्यांच्या पत्नी उषाताई खेडेकर यांनीही उपस्थित राहून संतांच्या स्मृतीस अभिवादन केले. आपल्या भाषणात डॉ. खेडेकर म्हणाले की, “संत सेवालाल महाराज यांनी समाजात ऐक्य, बंधुभाव आणि स्त्री सन्मान यांचा संदेश दिला. जातीभेद करू नका, सर्व समाजाचा आदर करा, महिलांचा सन्मान करा, वाद-विवाद टाळा असे त्यांचे २२ मौल्यवान विचार आजही समाजाला दिशा देतात. संत आज आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी आणि शिकवण आपल्याला सदैव प्रेरणा देत राहतील.”

मिरवणुकीत गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये रवी राठोड, संतोष चव्हाण, प्रवीण राठोड, धनंजय राठोड, विशाल राठोड, वैभव राठोड, जळगाराव राठोड, अमोल राठोड, अविनाश राठोड, कैलास राठोड, पोलिस पाटील के. बी. राठोड, अंकुश राठोड, विजय राठोड तसेच सरपंच विष्णु काकड, उपसरपंच सखाराम मळेकर, विष्णु माटे, बाळा बनसोडे, विनोद लाखे, विष्णु पांगारकर, प्रभाकर निबेकर, पवन सानप, बबन सानप, नागेश शिराळे, विशाल सोनुने, समाधान सोनुने, जनार्दन सोनुने, ज्ञानेश्वर पांगारकर, सैरव गिते, भागवत सोनुने, विजय चव्हाण, रजित माळेकर यांसह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

संपूर्ण मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. गावकऱ्यांनी एकोप्याने आणि शिस्तबद्ध पद्धतीने जयंती सोहळा साजरा करून सामाजिक ऐक्याचा आदर्श घालून दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!