जय गजाननजयंतीबुलढाणामहाराष्ट्रविदर्भसांप्रदायिकसिंदखेड राजा

श्री संत गजानन महाराजांच्या १४८ व्या प्रगट दिनानिमित्त पळसखेड चक्का येथे श्रद्धा, सेवा व अन्नदानाचा पवित्र सोहळा

सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का (जि. बुलढाणा) येथे श्री संत गजानन महाराज यांच्या १४८ व्या

श्री संत गजानन महाराजांच्या १४८ व्या प्रगट दिनानिमित्त पळसखेड चक्का येथे श्रद्धा, सेवा व अन्नदानाचा पवित्र सोहळा

 

                   प्रतिनिधी – पळसखेड चक्का 

सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का (जि. बुलढाणा) येथे श्री संत गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रगट दिनानिमित्त संपूर्ण गावाच्या वतीने अत्यंत श्रद्धा, भक्ती व सेवाभावाने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेली ही परंपरा गावकऱ्यांच्या एकतेचे, श्रद्धेचे व सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरत आहे.

 

या पावन दिवशी श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेची विधिवत स्थापना करून भाविकांच्या उपस्थितीत पूजा करण्यात आली. “गण गण गणात बोते” या नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला. या प्रसंगी कोणताही भेदभाव न ठेवता सर्व ग्रामस्थ एकत्र आले आणि भक्तीभावाने या कार्यक्रमात सहभागी झाले.

या ठिकाणी सरळ अन्नदान स्वरूपात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अन्नदान हेच श्रेष्ठ दान मानले जाते, या भावनेतून संपूर्ण गावाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. महिला मंडळ, पुरुष मंडळ, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महाप्रसादाचा लाभ घेतला. भक्ती, सेवा आणि समाधान यांचा संगम या ठिकाणी अनुभवायला मिळाला.

हा कार्यक्रम केवळ एक धार्मिक विधी नसून, गावातील ऐक्य, सहकार्य व सेवाभाव जपणारा सोहळा आहे. भविष्यात येणाऱ्या काळात या पवित्र प्रगट दिनाच्या निमित्ताने अधिकाधिक नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे सहभाग घ्यावा, अन्नदानासाठी मदतीचा हात पुढे करावा, आणि गजानन महाराजांच्या कार्यात स्वतःहून योगदान द्यावे, असे भावनिक आवाहन या माध्यमातून करण्यात येत आहे.

श्री संत गजानन महाराजांच्या कृपेने हा उपक्रम अधिक व्यापक व्हावा, अधिक भाविक जोडले जावेत आणि गावात सदैव सुख, शांती, एकोपा व समृद्धी नांदावी, अशीच सर्वांची प्रार्थना आहे.

गण गण गणात बोते…

जय गजानन महाराज!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!