
शखरिपाची पिके धोक्यात! सततच्या पावसाने शेतकरी चिंतेत
प्रतिनिधी – वाघाळा योगेश काकड
वाघाळा, सिंदखेडराजा – गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप मिळाली असली तरी सततच्या पावसामुळे खरिपाची पिके गंभीर धोक्यात आहेत. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पिकांवर रोगराई पसरली असून, गत दोन दिवसांपासून पसरलेल्या धुक्यामुळे आणि दमट वातावरणामुळे रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे.
यामुळे पिकांची वाढ थांबण्याची भीती आहे आणि उत्पन्नात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाघाळा, मेंडगाव, शिवणी, हिवरा, गडलिंग, हानुतखेड, जनुना आणि परिसरातील इतर गावातील शेतकरी सततच्या पावसाने हैराण झाले आहेत.
शेतकऱ्यांनी शासनाकडून ओला दुष्काळ जाहीर करून तातडीची भरीव मदत देण्याची मागणी या परिसरातील शेतकरी करीत आहे. सततच्या पावसामुळे निर्माण झालेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.
शेतकरीसंकट खरिपापिके सिंधखेडराजा पावसामुळेनुकसान ओलादुष्काळ




