क्राइमटॉप न्यूज़देशबुलढाणामहाराष्ट्रराज्यशेतीशेती न्यूज

रक्ताच्या थेंबा थेंबातून देशभक्ती! वीर जवान कैलास डोके पुतळ्याचे अनावरण व रक्तदान शिबिर संपन्न

रक्ताच्या थेंबा थेंबातून देशभक्ती! वीर जवान कैलास डोके पुतळ्याचे अनावरण व रक्तदान शिबिर संपन्न

देऊळगाव राजा तालुका | प्रतिनिधी भीमराव चाटे

रोहणा गावातील हुतात्मा जवान कैलास वसंतराव डोके यांच्या पुतळ्याचे अनावरण उत्साहात संपन्न झाले. सकाळी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी प्रभात फेरी व रॅली काढत देशभक्तीचे घोष ऐकवले.

वीर जवान स्मारकस्थळी वसंतराव डोके यांच्या हस्ते ध्वजारोहण व माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर व डॉ. सुनील कायंदे यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

सोबतच रक्तदान व आरोग्य शिबिर घेण्यात आले. सैनिक बांधव, युवकांनी रक्तदान करून देशभक्तीची भावना व्यक्त केली. डॉ. सूरज काकड यांनी मोफत तपासणी व औषध वाटप केले.

ग्रंथालय व सैनिकी भरतीसाठी साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन डॉ. खेडेकर यांनी दिले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. रोहणा गावातील हा उपक्रम कौतुकाचा विषय ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!