टॉप न्यूज़दिल्ली NCRदुनियादेशपंजाबबॉलीवुडमध्य प्रदेशमहाराष्ट्रराजनीतिराजस्थानराज्यलोकल न्यूज़

शेतकऱ्यांचा विजय – आंदोलनाशिवाय हक्क कधीच मिळत नाही! 

शेतकऱ्यांचा विजय – आंदोलनाशिवाय हक्क कधीच मिळत नाही!

शेतकरी योद्धा कृती समिती बुलढाणा जिल्हा 

दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकरी योद्धा कृती समिती, बुलढाणा जिल्हा व बळीवंश लोक चळवळ युवा संघर्ष समिती सिंदखेड राजा यांच्या नेतृत्वाखाली सिंदखेडराजा उपविभागीय व तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात इतर विधानसभा क्षेत्रांतही निवेदने देण्यात आली होती.

या लढ्यात सिंदखेडराजा, लोणार आणि देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग झाला. शेतकऱ्यांच्या या एकतेमुळेच अखेर सरकारला झुकावे लागले आणि मागण्या मंजूर झाल्या.

1️⃣ राशनऐवजी दिली जाणारी 150 रुपयांची रक्कम अपुरी आहे, ती वाढवा.

2️⃣ ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत राशनची रक्कम मिळालेली नाही, त्यांना त्वरित पैसे द्या.

या दोन्ही मागण्या मंजूर –

शेतकऱ्यांना आता 150 ऐवजी 170 रुपये प्रति व्यक्ती मिळणार आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील 58,335 शेतकरी व 2,18,562 लाभार्थ्यांना तब्बल 3 कोटी 71 लाख 55 हजार 540 रुपये मंजूर झाले आहेत.

हा विजय शेतकऱ्यांच्या एकतेचा पुरावा आहे.

शेतकरी उठला तरच सरकार ऐकते – घरबसल्या हक्क कधीच मिळत नाहीत.

शेतकरी योद्धा कृती समिती, बुलढाणा जिल्हा

 बळीवंश लोक चळवळ युवा संघर्ष समिती सिंदखेड राजा 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!