जीवनात आपले ध्येय गाठायचे असेल तर मोबाईल पासून दूर राहा प्रवीण शिंदे ठाणेदार
रेझिंग डे सप्ताह निमित्त कार्यक्रम,कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन चा उपक्रम

जीवनात आपले ध्येय गाठायचे असेल तर मोबाईल पासून दूर राहा प्रवीण शिंदे ठाणेदार

वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे
रेझिंग डे सप्ताह निमित्त कार्यक्रम,कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन चा उपक्रम विद्यार्थ्यांना आपल्या जीवनाचे ध्येय गाठायचे असेल तर मोबाईल पासून दूर राहा म्हणजे सोशल मीडिया उदाहरणार्थ फेसबुक, व्हाट्सअप,इंस्टाग्राम हे आपला अमूल्य वेळ गमावतात व आपल्या ध्येयापासून दूर नेतात, असे आवाहन कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण शिंदे यांनी रेझिंग डे निमित्त बाबासाहेब धाबेकर विद्यालय,यावर्डी येथे आयोजन कार्यक्रमात केले. दिनांक 2 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पोलीस स्थापना दिवसा निमित्त (रेझिंग डे) बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी येथे आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय भड तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण शिंदे,तर दीपक ढोबळे, गावचे पोलीस पाटील सुनील पाटील ठाकरे, सरपंच प्रतिनिधी परमेश्वर आमले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ठाणेदार प्रवीण शिंदे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांनी सत्कार केला. उपस्थित सर्व मान्यवरांच्या स्वागतानंतर प्रमुख मार्गदर्शक ठाणेदार प्रवीण शिंदे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस स्थापना दिवसाबद्दल माहिती देऊन पोलीस हे आपले मित्र कसे आहेत,हे पटवून दिले.तसेच विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून दूर राहावे कारण शोशल मीडिया आपला अमूल्य वेळ गमावतात त्यामुळे आपण आपल्या ठरवल्या ध्येयापासून दूर जातो म्हणून मोबाईलचा वापर टाळावा असे आवाहन केले. अध्यक्ष भाषणात शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांनी ठाणेदार प्रवीण शिंदे यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनाचा मंत्र दिल्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन राजेश शेंडेकर तर आभार अनिल हजारे यांनी मानले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच वर्ग 8, 9 व 10 चे विद्यार्थी उपस्थित होते.




