क्राइमगडचिरोलीपोलीस

एटापल्ली हादरले! नव्या घराच्या शौचालय टॅकमध्ये

एटापल्ली शहरात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उपस्थित

एटापल्ली हादरले! नव्या घराच्या शौचालय टॅकमध्ये कुजलेला अनोळखी पुरुष मृतदेह आढळून खळबळ

एटापल्ली (जिल्हा प्रतिनिधी : तेजेश गुज्जलवार)

एटापल्ली शहरात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील वार्ड क्रमांक ०९, हनुमान नगर परिसरात नव्याने सुरू असलेल्या घराच्या शौचालयाच्या टॅकमध्ये कुजलेल्या अवस्थेत बेवारस अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी उघडकीस आली. सदर प्रकरणी एटापल्ली पोलीस स्टेशनमध्ये मर्ग क्र. १९/२०२५ अन्वये कलम १९४ भा.ना.सुं.स. २०२३ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.

घरमालक कुणाल तुळशिराम करमरकर (वय ३१, रा. हनुमान नगर, एटापल्ली) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या नव्या बांधकामातील शौचालयाच्या टॅकमध्ये दुर्गंधी येत असल्याने पाहणी केली असता आत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच एटापल्ली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेतला.

मयत इसमाचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे, उंची सुमारे ५ फूट ४ इंच, बांधा मध्यम, चेहरा गोल, कपाळ पुढे उंच असून केस काळे व २ ते ३ इंच लांबीचे आहेत. विशेष म्हणजे मृताच्या उजव्या पायाचा अंगठा तुटलेला आहे. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

घटनास्थळी निळ्या रंगाचा XL आकाराचा चायनीज कॉलर फुल शर्ट, काळ्या रंगाचा XL गोल गळ्याचा ‘NARUTO’ असा मजकूर असलेला टी-शर्ट तसेच आकाशी रंगाचा हातरुमाल मिळून आला आहे.

सदर अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. वरील वर्णनाशी जुळणारी व्यक्ती कुणी हरवलेली असल्यास तात्काळ एटापल्ली पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संपर्कासाठी : पोलीस निरीक्षक नगरगोजे  ८८८८८४१७२७

पोलीस उपनिरीक्षक गजानन साखरे — ७७७४८४४२३१

दरम्यान, भरवस्तीत अशा प्रकारे मृतदेह आढळून येणे म्हणजे एटापल्ली शहरातील सुरक्षेचा आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा गंभीर प्रश्न असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास एटापल्ली पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!