बुलढाणामराठवाडामहाराष्ट्ररेल्वेवाशिमविदर्भशेतकरीसिंदखेड राजा

मराठवाडा व विदर्भ या दोन विभागांना जोडणारा जालना–सिंदखेड राजा–दुसरबीड–लोणार सरोवर–लोणी–वाशीम

जालना–सिंदखेड राजा–वाशीम नवीन रेल्वे मार्गास मंजुरी द्या

सिंदखेड राजा (जि. बुलढाणा) : गजानन सोनुने

मराठवाडा व विदर्भ या दोन विभागांना जोडणारा जालना–सिंदखेड राजा–दुसरबीड–लोणार सरोवर–लोणी–वाशीम असा सुमारे १५० कि.मी. लांबीचा नवीन रेल्वे मार्ग तातडीने मंजूर करून तो महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व विकास आराखड्यात समाविष्ट करण्यात यावा, अशी ठाम मागणी राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीदिनी करण्यात आली.

राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मभूमी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मकरंद आबा पाटील/जाधव यांना हेलिपॅडवर लेखी निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन सामाजिक कार्यकर्ते गजानन भाऊ दराडे व नानासाहेब तोर फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले की, हा प्रस्तावित रेल्वे मार्ग मराठवाडा व विदर्भाला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार असून, सिंदखेड राजा, लोणार सरोवर, वाशीम येथील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना पर्यटनाच्या दृष्टीने मोठी चालना मिळणार आहे. तसेच शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांसाठी दळणवळण सुलभ होऊन औद्योगिक व रोजगाराच्या संधी वाढणार आहेत.

या दोन्ही रेल्वे मार्गांबाबत शासनाने ठोस निर्णय, निश्चित कालमर्यादा, निधीची तरतूद व लेखी हमी द्यावी, अन्यथा आंदोलन समितीच्या माध्यमातून अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोजभाऊ कायंदे, माजी नगराध्यक्ष देविदास भाऊ ठाकरे (सिंदखेड राजा), भाजप तालुका उपाध्यक्ष सुरेशभाऊ बुलकडे, गजानन सोनुने, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी निवेदन स्वीकारून सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!