शेलूबाजार स्टार ११ क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात चिखली झोलेबाबा
शेलूबाजार स्टार ११ संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण

शेलूबाजार स्टार ११ क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात चिखली झोलेबाबा
वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे
शेलूबाजार स्टार ११ संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम काल चिखली झोलेबाबा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते तसेच सावता परिषदेचे कार्याध्यक्ष आणि वाशिम–मंगरूळपीर विधानसभा अध्यक्ष पांडुरंग कोठाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या वेळी पांडुरंग कोठाळे यांच्या हस्ते स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजयी संघास ट्रॉफी व आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली. पुरस्कार वितरणानंतर त्यांनी विजयी संघास शुभेच्छा देत खेळाडूंशी संवाद साधला. ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडा संस्कृती रुजणे गरजेचे असून अशा स्पर्धांमुळे तरुणांमध्ये शिस्त, संघभावना आणि आरोग्याची जाणीव निर्माण होते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या क्रिकेट स्पर्धेमध्ये परिसरातील अनेक संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. गावकरी व क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शेलूबाजार स्टार ११ संघाच्या सर्व सदस्यांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. या वेळी गोविंद भेराने, विलास लांभाडे, जय गुप्ता, खुशाल चौधरी, सोनू अपूर्वा, सचिन राऊत, शहजाद शहा यांच्यासह अनेक क्रीडाप्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बक्षीस वितरण सोहळ्यामुळे खेळाडूंना नवी ऊर्जा मिळाली असून भविष्यातही अशा स्पर्धा नियमितपणे आयोजित करण्यात याव्यात, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.




