टॉप न्यूज़देशबुलढाणामहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़शेतीशेती न्यूज

“मुंडे साहेबांचा शेवटचा संदेश ज्याने ऐकला— त्या पळसखेडने स्मारकासाठी आज इतिहास घडवण्याचा निर्धार केला!”

“मुंडे साहेबांचा शेवटचा संदेश ज्याने ऐकला— त्या पळसखेडने स्मारकासाठी आज इतिहास घडवण्याचा निर्धार केला!”

पळसखेड चक्का, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा

कार्यक्रमाला माऊली हॉस्पिटल, किनगाव राजा येथील डॉ. ज्ञानेश्वर नागरे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तालुका अध्यक्ष सिद्धू जाधव यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. पाहुण्यांनी मुंडे साहेबांच्या लोकाभिमुख कार्याचा उजाळा दिला.

 

कार्यक्रमामध्ये फराळाचे वाटप करण्यात आले तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे ट्रस्टतर्फे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वही–पेन वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.

सूत्रसंचालन जगदीश मुंडे यांनी तर प्रास्ताविक शेतकरी नेते बालाजी सोसे यांनी केले. प्रास्ताविकात

शेतकरी नेते बालाजी सोसे यांनी विशेषपणे सांगितले की,नागपूर विधानसभेच्या संघर्ष यात्रेदरम्यान मुंडे साहेबांनी पळसखेड चक्का येथील बस स्टॉपवर थांबून संतश्रेष्ठ भगवान बाबांना अभिवादन केले आणि गावकऱ्यांना दिलेला पहिला आणि शेवटचा असा सात मिनिटांचा मोलाचा संदेश आजही गावाच्या हृदयात जिवंत आहे. ही आठवण पळसखेडच्या प्रत्येक कुटुंबात आजही खोलवर रुजलेली आहे.

गावातील अनेक नागरिक दरवर्षी परळी येथील गोपीनाथगड तसेच भगवानगड येथे मोठ्या संख्येने दर्शनासाठी जातात. हे मुंडे साहेबांविषयी असलेल्या प्रेमाचे प्रतीक असल्याचे पाहुण्यांनीही नमूद केले.

या कार्यक्रमात पळसखेड चक्का गावातील युवक व शेतकरी बांधवांनी एकमुखाने मागणी व्यक्त केली—

“गावात लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्मारक उभारले जावे!”

गावकरी, तरुण व शेतकरी वर्ग यांनी या स्मारकासाठी एकजुटीने संघर्ष सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.

स्मारकाच्या मागणीसाठीचा लढा आजपासूनच अधिक ठामपणे सुरू झाला, अशी घोषणा प्रास्ताविकात करण्यात आली.

मुंडे साहेबांच्या आठवणींना चिरंतन ठेवण्यासाठी गाव एकदिलाने पुढील काळात ठोस पावले उचलणार असल्याची अपेक्षा व्यक्त करून कार्य

क्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!