अवैद्य धंदेक्राइममहाराष्ट्रवाशिमसरकारी योजना

मंगरुळपीर तालुक्यात अवैध तांदूळ माफिया जोमात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सरकारी धान्याचा काळाबाजार

मंगरुळपीर तालुक्यात शासकीय स्वस्त धान्य दुकानांमधून वितरित होणारा तांदूळ अवैधरित्या खरेदी-विक्री करून

मंगरुळपीर तालुक्यात अवैध तांदूळ माफिया जोमात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सरकारी धान्याचा काळाबाजार

 

            वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे

 

मंगरुळपीर तालुक्यात शासकीय स्वस्त धान्य दुकानांमधून वितरित होणारा तांदूळ अवैधरित्या खरेदी-विक्री करून मोठ्या प्रमाणावर काळाबाजार केला जात असल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहेत. गरीब व गरजू लाभार्थ्यांसाठी असलेले धान्य थेट माफियांच्या घशात जात असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवैध तांदूळ माफिया जोमात असल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये रेशन दुकानातून मिळणारा तांदूळ कमी दरात लाभार्थ्यांकडून खरेदी करून तो खासगी गोदामात साठवला जात असल्याची माहिती आहे. त्यानंतर हा तांदूळ चांगल्या दर्जाचा असल्याचे भासवून बाजारात, हॉटेल्स, ढाबे तसेच लग्नसमारंभांसाठी जादा दराने विकला जात आहे.

विशेष म्हणजे हा अवैध धंदा खुलेआम सुरू असतानाही पुरवठा विभाग, तहसील प्रशासन व पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. अधूनमधून होणाऱ्या कारवाया या केवळ किरकोळ विक्रेत्यांपुरत्याच मर्यादित राहतात, मात्र मुख्य सूत्रधारांवर हात घालण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप आहे.

या काळाबाजारामुळे गरिबांचे हक्काचे धान्य हिरावले जात असून शासनाच्या योजनेचा मूळ उद्देशच मोडीत निघत आहे. अनेक ठिकाणी लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा किंवा अपुरा तांदूळ दिला जात असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.

मंगरुळपीर तालुक्यातील नागरिकांनी अवैध तांदूळ माफियावर तात्काळ कठोर कारवाई करावी, दोषींवर गुन्हे दाखल करून परवाने रद्द करावेत, तसेच गोदामांची झडती घ्यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

शासकीय धान्याचा गैरवापर थांबवण्यासाठी प्रशासनाने तत्काळ ठोस पावले उचलणे गरजेचे असून, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!