छत्रपती शिवाजी महाराजजय जिजाऊमहाराष्ट्रमहिलाविदर्भसावित्रीबाई फुले

जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात भाविकांसाठी बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीकडून भव्य गावरान भोजन सेवा

मातृशक्तीचे प्रतीक, स्वराज्य प्रेरणास्थान राष्ट्रमाता जिजा

जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात भाविकांसाठी बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीकडून भव्य गावरान भोजन सेवा

     सिंदखेड राजा | प्रतिनिधी श्री रवी ढवळे 

मातृशक्तीचे प्रतीक, स्वराज्य प्रेरणास्थान राष्ट्रमाता जिजाऊ मातेच्या जन्मोत्सवानिमित्त मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे महाराष्ट्रभरातून लाखो भाविक दाखल झाले होते. या जिजाऊ भक्तांच्या सेवेसाठी सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी, कष्टकरी व मजुरांची बँक म्हणून ओळख असलेल्या “बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटी”ने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामाजिक बांधिलकी जपत भव्य भोजन सेवेचे आयोजन केले.

बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटी ही केवळ बँकिंग व्यवहारापुरती मर्यादित नसून, सामाजिक, सांस्कृतिक व लोकाभिमुख उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर राहिली आहे. त्याच सामाजिक जाणिवेचा प्रत्यय दि. १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने आला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भाईजी,

संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. श्री. सुकेशजी झंवर सर,

मा. सौ. कोमलताई झंवर मॅडम,

सरव्यवस्थापक मा. श्री. कैलासजी कासट सर

यांच्या दूरदृष्टीपूर्ण व सेवाभावी संकल्पनेतून तसेच

बुलढाणा अर्बन विभाग मेहकरचे विभागीय व्यवस्थापक मा. श्री. किरण सिरसाट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,

सिंदखेड राजा शाखेच्या नियोजित जागेत जिजाऊ भक्तांसाठी पारंपरिक गावरान भोजन — बाजरी भाकरी व ठेचा — यांची भव्य व्यवस्था करण्यात आली होती.

या भोजन सेवेचा सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत हजारो भाविकांनी लाभ घेतला.

“गोरगरीबांचा खरा आधार असलेली बँक” म्हणून बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीने केलेल्या या उपक्रमाचे भाविकांकडून मनापासून कौतुक करण्यात आले.

याप्रसंगी

भरारी पथक प्रमुख मा. श्री. संजय कुलकर्णी साहेब,

बीड विभागाचे विभागीय व्यवस्थापक मा. श्री. संजय देशमुख साहेब,

शाखा व्यवस्थापक श्री. किसनराव शेवाळे साहेब,

श्री. अभय महाळनकर, श्री. विजय सोनुने, श्री. स्वप्नील देशमुख,

श्री. योगेश कुलकर्णी

तसेच सिंदखेड राजा येथील प्रतिष्ठित नागरिक, खातेदार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी

सिंदखेड राजा शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री. उदय कुलकर्णी साहेब,

सहाय्यक शाखा व्यवस्थापक श्री. रविंद्र सानप

यांच्यासह

श्री. लक्ष्मण रायमुल, श्री. संतोष काकडे, श्री. रामेश्वर मोहिते, श्री. विलास ठाकरे, श्री. ज्ञानदेव शिराळ, श्री. योगेश सुरडकर, श्री. मंदार देशपांडे, श्री. विवेक देशमाने, सौ. सुजाता पेटकर, सौ. मंदाकिनी जाधव, सौ. सारिका जाधव, श्री. दीपक चरपे, श्री. आदित्य देशमुख

यांनी अथक परिश्रम घेतले.

बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटी ही गोरगरीब शेतकरी, कष्टकरी व सामान्य माणसाची बँक असून, समाजाशी असलेली नाळ जपणारे असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!