रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी; सुरक्षित प्रवासातूनच सुरक्षित भविष्य – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
वाशिममध्ये ३७ वे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती रॅली उत्साहात

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी; सुरक्षित प्रवासातूनच सुरक्षित भविष्य – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
‘रस्ता सुरक्षा – जीवन रक्षा’चा जागर
वाशिममध्ये ३७ वे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती रॅली उत्साहात
वाशिम, दि. १३ जानेवारी (जिमाका) | जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे
‘रस्ता सुरक्षा – जीवन रक्षा’ हा संदेश केवळ घोषवाक्यापुरता मर्यादित न ठेवता तो प्रत्येकाच्या दैनंदिन सवयींमध्ये उतरवणे गरजेचे आहे. सुरक्षित वाहनचालना ही केवळ स्वतःचीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाची सुरक्षितता आहे. त्यामुळे वाहन चालविताना संयम, शिस्त आणि जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असून जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
जिल्ह्यात ३७ वे रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत “रस्ता सुरक्षा – जीवन रक्षा” या संदेशासह भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रॅलीला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.
या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संग्राम जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता अजीम शेख, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब नाईक, मोटार वाहन निरीक्षक दिनेश सुरडकर, विनोद घनवट, रोहीदास विनकरे तसेच दादासाहेब बढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वाहन चालविताना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन, हेल्मेट व सीट बेल्टचा नियमित वापर, वेगमर्यादेचे पालन, मद्यपान करून वाहन न चालवणे तसेच वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर टाळणे यांचे महत्त्व अधोरेखित केले. रस्ता अपघातांमुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून सुरुवात करावी, असे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान वाहतूक नियमांवरील माहितीपत्रक व पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. या साहित्याच्या माध्यमातून वाहनचालक, विद्यार्थी व सामान्य नागरिकांना सुरक्षित वाहनचालना, वाहतूक नियम व अपघात प्रतिबंधाबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
ही जनजागृती रॅली जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथून सुरू होऊन पोलीस अधीक्षक कार्यालय, विश्राम भवन, सिव्हिल लाईन बस स्थानक, आंबेडकर चौक, पाटणी चौक, अकोला नाका, नगर परिषद मार्गे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशिम येथे समारोप करण्यात आली.
जिल्ह्यात रस्ता सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती निर्माण करून सुरक्षित प्रवासाची संस्कृती रुजविण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार असून “रस्ता सुरक्षा – जीवन रक्षा” हा संदेश प्रत्येक नागरिकाच्या मनात रु




