ग्रुप ग्रामपंचायत देशमाने बुद्रुक/खुर्द यांच्या वतीने महिलांसाठी पारंपरिक हळदी-कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्नक
येवला तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत देशमाने बुद्रुक/खुर्द

ग्रुप ग्रामपंचायत देशमाने बुद्रुक/खुर्द यांच्या वतीने महिलांसाठी पारंपरिक हळदी-कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्नक
नाशिक – येवला प्रतिनिधी : प्रविण पाटील
येवला तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत देशमाने बुद्रुक/खुर्द यांच्या वतीने गावातील महिलांसाठी पारंपरिक हळदी-कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. महिलांच्या सामाजिक एकोपा व सांस्कृतिक परंपरेचे जतन व्हावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शोभाताई दुघड होत्या, तर उपसरपंच म्हणून सरलाताई जगताप उपस्थित होत्या. कार्यक्रमास ग्रामपंचायतीच्या महिला व पुरुष सदस्यांची लक्षणीय उपस्थिती होती. यामध्ये ग्रामपंचायत सदस्या इंदुबाई आरगडे, सोनाली गोरे, मंदा औटी, अलका आरगडे यांच्यासह पुरुष सदस्य व पत्रकार प्रमोद दुघड, संजय खैरनार, यशवंत जगताप, अण्णा पवार, बापूसाहेब काळे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी गावातील अंगणवाडी सेविका कांचन पवार, मंगल जगताप, राणी नगरकर, पूजा भालके, सुनीता तळेकर, सिंधू काळे, लतिका जाधव तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका परीघा झाल्टे व ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग जमधाडे यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमात महिलांनी पारंपरिक पद्धतीने हळदी-कुंकू लावून एकमेकींना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थित महिलांचा सन्मान करण्यात आला. महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रमाचा आनंद घेतला.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. सदर कार्यक्रमामुळे महिलांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक सलोखा अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
नाशिक – येवला प्रतिनिधी : प्रविण पाटील




