बुलढाणा जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असतानाही, प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे.

शेतकऱ्याच्या बांधावरून – सरकारच्या गादीला हादरा!
शेतकऱ्याचे प्रश्न – थेट शेतातून, उद्या दुपारी १२ वाजता
बुलढाणा जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असतानाही, प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे.
सिंदखेडराजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यातील शेकडो शेतकरी पुरते उद्ध्वस्त झाले.
तरीही प्रशासनाने ओला दुष्काळ जाहीर करण्यास नकार दिला आहे.
पर्जन्यमापक यंत्रणेच्या चुकीच्या आकडेवारीवर सरकारचा विश्वास ठेवला जातो, पण शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतावर उभं राहून सत्य पाहायला कोणी तयार नाही.
शेतकरी योद्धा कृती समितीचे सवाल
1️⃣ शेतकऱ्यांनी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी प्रशासनाला वेळ दिला. तरीदेखील ओला दुष्काळ जाहीर झाला नाही – हे प्रशासनाचं गंभीर अपयश नाही का?
2️⃣ आम्ही इशारा दिला होता – जर मागणी मान्य झाली नाही, तर सिंदखेडराजा तालुक्यातील शेवटच्या गावापासून उपविभागीय कार्यालयापर्यंत लॉंग मार्च काढला जाईल. अजूनही प्रशासन जागं झालं नाही, का?
3️⃣ खरीप व रब्बी 2024 चा पिक विमा – शेतकऱ्याने भरला फक्त १ रुपया सरकारची घोषणा पण प्रत्यक्षात शेतकऱ्याला शंभर रुपये लागतात, सरकारने कंपनीच्या तिजोऱ्या भरल्या कोट्यवधींनी. मग शेतकऱ्याला मात्र कवडीचीही मदत का मिळाली नाही?
शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. बालाजी सोसे, उद्या दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता शेतकऱ्याच्या पिकाच्या बांधावरून पत्रकार परिषद घेऊन सरकारला थेट सवाल करणार आहेत.
त्यांनी ठाम इशारा दिला आहे की :
> “आम्ही शांततेने वाट पाहिली, पण प्रशासनाने कानावर हात ठेवले. आता वेळ आली आहे संघर्षाची!
शेतकरी मातीमध्ये गेला तरी सरकार बघत नाही उलट शेतकऱ्याची सरकार मधलेच काही मंत्री शेतकऱ्यांची चेष्टा करतात ,आम्ही आता गप्प बसणार नाही –
सरकार आणि कंपनीचा संगनमताचा खेळ उघड करणार!”
शेतकरी बांधवांना आवाहन
जर आपण आज आवाज उठवला नाही,
जर आपण आज रस्त्यावर उतरलो नाही, तर 2025 च्या पिक विम्यापासून आपण वंचित राहू! हा संघर्ष एका शेतकऱ्याचा नाही, हा तमाम शेतकऱ्याचा आहे.
म्हणून सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा.
“शेतकरी उठला तर सरकारच्या पायाखालची वाळू सरकते!”
शेतकरी योद्धा कृती समिती, बुलढाणा जिल्हा




