टॉप न्यूज़बुलढाणामहाराष्ट्रयुवाशेतीशेती न्यूज

ढगफुटी अतिवृष्टीने सिंदखेडराजा तालुक्यात शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान!

ढगफुटी अतिवृष्टीने सिंदखेडराजा तालुक्यात शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान!

शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री बालाजी सोसे

आज दुपारी दोन ते सहा वाजेच्या दरम्यान सिंदखेडराजा तालुक्यातील सिंदखेडराजा महसूल मंडळ आणि किनगाव राजा महसूल मंडळ या दोन महसूल मंडळांमध्ये ढगफुटी स्वरूपाचा अतिवृष्टीसमान पाऊस झाला.

यामुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. शेतामध्ये अक्षरशः मोठाले पाझर तलाव साचले असून, पातळगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर जाऊन थेट शेतात घुसले आहे.

शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणीसह व्हिडिओद्वारे ही परिस्थिती दाखवली आहे.

👉 विशेष म्हणजे, किनगाव राजा महसूल मंडळातील पर्जन्यमापक यंत्रणा गेल्या दोन वर्षांपासून व्यवस्थित आकडेवारी दाखवत नाही.

पाऊस कोसळत असतानाही या यंत्रणेमुळे पाऊस कमी दाखवला जातो, त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

प्रशासन मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे.

शेतकरी योद्धा कृती समितीच्या माध्यमातून हा प्रश्न सरकारसमोर उपस्थित करण्यात आला आहे.

समितीचे संस्थापक सदस्य शेतकरी नेते पांडुरंग सोसे यांनी थेट सवाल केला –

> “सरकार अजून किती दिवस शेतकऱ्याचे रक्त प्यायचे आहे?

हे पाणी नसून शेतकऱ्याचे रक्त पडत आहे. मायबाप सरकारने तातडीने मदत द्यावी!”

 

जर उद्यापर्यंत पर्जन्यमापक यंत्रणेची आकडेवारी व्यवस्थित दिसली नाही तर यंत्रणेच्या कामकाजाबाबत मोठा प्रश्न उपस्थित केला जाईल, असा इशारा समितीने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!