Uncategorized

किनगाव शेतकऱ्याची हाक – “थोंडाचा घास हिरावला, सरकार कुठं झोपलंय?”

पत्रकार प्रतिनिधी विशाल काळबोंडे 

किनगाव जटू (गट नंबर 303) येथील अल्पभूधारक शेतकरी श्रीराम भिका सानप यांच्या शेतामध्ये अतिवृष्टीमुळे संपूर्णपणे पाणी साचलेले आहे. पिकाचे एकही कणीस वाचले नाही. त्यांच्या संसाराचा उदरनिर्वाह केवळ शेतीवर अवलंबून असताना हे संकट डोंगरासारखे कोसळले आहे.

शेतकरी श्रीराम सानप यांचा “थोंडाचा घास हिरावून” गेला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, जनावरांची काळजी – सर्व काही या एकाच शेतावर अवलंबून होते. आता सर्व काही पाण्याखाली गेल्याने त्यांचे संसाराचे चित्र पूर्णपणे बदलून गेले आहे.

मात्र, आजपर्यंत शासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. मदतीच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जातात पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या घरी केवळ आसवांचा पाऊस कोसळतो. सरकारचे डोळे अजूनही मिटलेलेच दिसतात.

शेतकरी सानप यांची थेट मागणी आहे की – “आमच्यासारख्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, नाहीतर हे संकट केवळ एका शेतकऱ्यावर नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या जगण्यावर आघात करणार आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!