प्रा. बळीराम जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम व खेळ महोत्सवाने सिंदखेड राजामध्ये उत्साहाचे वातावरण

प्रा. बळीराम जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम व खेळ महोत्सवाने सिंदखेड राजामध्ये उत्साहाचे वातावरण
सिंदखेड राजा (ता. 11 ऑक्टोबर 2025) —
संत सावता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सिंदखेड राजा यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आणि विद्यमान सरपंच प्रा. बळीराम जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा उपक्रम साजरा करण्यात आला. या निमित्ताने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय खेळ महोत्सव व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात चित्रकला, संगीत खुर्ची, निबंध लेखन, खो-खो, कबड्डी आणि धावण्याच्या स्पर्धा रंगल्या. विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आपल्या प्रतिभेची झलक दाखवली. विशेषतः लहान विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला. खेळ आणि कलांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता व संघभावनेचे सुंदर दर्शन घडविले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. बळीराम जाधव उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य प्रा. सुधाकर गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. आयोजनात शिक्षक तेजराव घुगे, अभिजित मेहत्रे, वैष्णवी अंभोरे (सांस्कृतिक विभागप्रमुख), रुख्मिणी तोर, पायल पवार, दिपाली सातपुते, उषा काळे, व मनीष बुंधे यांनी परिश्रम घेतले.
ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास दराडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रोशनी चांडक, डॉ. शुभम सोनुने, डॉ. अक्षय शिंगणे, तसेच प्रवीण गायकवाड, दीक्षा गोदाम, नारायण सूरवसे, रामदास महाडिक, आणि शंभूराजे मानतकर आदी कर्मचारी या सामाजिक उपक्रमात सहभागी झाले.
सामाजिक बांधिलकी, शालेय संस्कार आणि आरोग्यदायी खेळभावना या तिन्ही मूल्यांचा संगम साधणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.




