पेट्रोल पंपबुलढाणामहाराष्ट्रसामाजिक कार्यकर्तेसिंदखेड राजासोशल मीडिया

सिंदखेडराजा परिसरात अफवेमुळे नागरिकांमध्ये घबराट

आज सकाळपासून सिंदखेडराजा व किनगाव राजा परिसरात पेट्रोल-डिझेल संदर्भात “पीओ फुटल्याची”

सिंदखेडराजा परिसरात अफवेमुळे नागरिकांमध्ये घबराट

       सिंदखेडराजा | प्रतिनिधी बालाजी सोसे

आज सकाळपासून सिंदखेडराजा व किनगाव राजा परिसरात पेट्रोल-डिझेल संदर्भात “पीओ फुटल्याची” अफवा वेगाने पसरल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे.
या अफवेच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंपांवर नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली असून, अनेक ठिकाणी तब्बल 200 ते 250 दुचाकी तसेच 25 ते 50 मोठी वाहने लांबच लांब रांगेत उभी असल्याचे चित्र दिसत आहे.
पंपांवर अक्षरशः झुंबड उडाल्याने वाहतूक व्यवस्थेवरही ताण निर्माण झाला आहे.
मात्र, या संपूर्ण घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.
त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून,
जिल्हाधिकारी कार्यालयाने तात्काळ स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका — प्रशासनाच्या अधिकृत सूचनांची वाट पहा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!