टॉप न्यूज़देशबुलढाणामहाराष्ट्रलोकल न्यूज़शेतीशेती न्यूज

वाहिवाटी रस्त्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांचे उपोषण चार दिवसांनंतर सुटले

  • वाहिवाटी रस्त्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांचे उपोषण चार दिवसांनंतर सुटले

सिंदखेड राजा : प्रतिनिधी (दुसरबीड गजानन सोनुने  )

दुसरबीड येथील शेतकऱ्यांनी वाहिवाटी रस्त्याच्या प्रश्नावर सिंदखेड राजा तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर अखेर चार दिवसांनंतर मागे घेण्यात आले.

वाहिवाटी रस्ता खुला नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या चर्चांना अखेर यश आले.

या संदर्भात सिंदखेड राजा तहसीलचे माननीय तहसीलदार दिवटे साहेब यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच राजा पोलिस स्टेशन व किनगाव राजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांच्या उपस्थितीतही चर्चा झाली. चर्चेनंतर प्रशासनाने वाहिवाटी रस्त्याबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही करून रस्ता खुला करून देण्याचे आश्वासन दिले.

प्रशासनाच्या या आश्वासनाला मान देत उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले. ही माहिती शिवानंद विठोबा सांगळे व इतर उपोषणकर्त्यांनी फोनद्वारे कळविली.

.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!